कोल्हापूर : "कोल्हापूर की, खड्डेपूर' अशी जोरदार घोषणा देत रस्ते प्रश्नावरून शहरातील रिक्षाचालकांनी आज थेट महापालिकेसमोर रिक्षा पार्किंग करून अभिनव आंदोलन केले. महापालिका पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नी समिती नियुक्ती करून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ती "सकाळ'ने गेल्या 15 दिवसांपासून वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढे आणली.
जिल्हा वाहनधारक महासंघ या प्रश्नावरून सातत्याने आंदोलन करत आहे. महापालिकेने गेल्या नोव्हेंबरमध्ये रस्ते टकाटक करण्याचे आश्वासन दिले होते. उन्हाळ्यात कोरोनाचे संकट उभे राहिले. शहर लॉकडाउन झाले; पण खड्ड्यांची डागडुजी झाली नाही. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट झाली. प्रमुख रस्ते चकचकीत दिसत असले तरी अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. "सकाळ' ने भागनिहाय रस्त्यांची दुरवस्था मांडली. लोकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर आजच्या महासभेच्या दिवशीच रिक्षाचालकांनी या प्रश्नी लक्ष वेधले. सकाळी 11 वाजता डोक्यावर पिवळ्या रंगाच्या टोप्या, त्यावर "कोल्हापूर की खड्डेपूर' अशा आशयाचा मजकूर लक्षवेधी ठरत होता.
रिक्षाचालकांनी पालिकेसमोरील रस्त्यावर रिक्षांचे पार्किंग केले. नंतर यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
अखेर महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, महिला, बालकल्याण सभापती शोभा कवाळे, गटनेता शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, सचिन चव्हाण आदी आंदोलकांसमोर आले. त्यांनी ज्या रस्त्यांची कामे होणार आहेत, त्याची यादी आंदोलकांना दाखविली.
या प्रश्नी तातडीने समितीची नियुक्ती करून त्यांच्या देखरेखीखाली कामे सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, इंद्रजित आडगुळे, नीलेश हंकारे, दिलीप सूर्यवंशी, आनंदा चिले, अतुल माळकर, जुनेद शेख, बादशहा फरास, विठ्ठल जानकर, नामदेव पाडळकर, निवास बोडके, नागेश बुचडे, उदय गायकवाड, संतोष भंडारे आदी आंदोलनात सहभागी झाले.
मागण्या अशा :
* खराब रस्ते नव्याने करावेत.
* खड्ड्यांचे पॅचवर्क दर्जेदार करावे.
* जे रस्ते खराब आहेत त्यांची महापौर, आयुक्तांनी पाहणी करावी.
* ठेकेदाराकडून नियमाप्रमाणे रस्ते करून घ्यावेत.
* संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे.
* रस्त्यांच्या निविदा तातडीने प्रसिद्ध कराव्यात.
आंदोलनाला "सकाळ' चे बळ
शहरातील रस्त्यांची नेमकी स्थिती कशी आहे, याच्या छायाचित्रासह बातमीच्या माध्यमातून "सकाळ'ने लक्ष वेधले. कंबरेच्या हाडांचा खुळखुळा कसा होतो, वाहनांच्या सुट्या भागांना कसा दणका बसतो, याची माहिती यातून दिली. नागरिकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. शहरवासीयांच्या वेदनेला वाट करून देण्याचे काम "सकाळ' ने केले. त्यास वाहनधारक महासंघाने साथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.