Flood Kolhapur Sakal
कोल्हापूर

Kolhapur Flood : वेळीच उपाय न केल्यास महापुराचा धोका; पुराच्या पाण्यामुळं वाहतूक करावी लागणार बंद!

यावर्षी रस्त्यावर महापुराचे पाणी आल्यानंतर वाहतूक ठप्प तर होणारच आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रतिवर्षी वेदगंगा नदीला महापूर येतो. मुरगूड शहरात येण्यासाठी मुदाळतिट्टा, निपाणी हे दोन महत्वाचे मार्ग आहेत.

मुरगूड : निपाणी - फोंडा राज्यमार्गावर (Nipani - Fonda State Highway) शिंदेवाडी, मुरगूड व निढोरी येथे वेदगंगा नदीला महापूर (Vedganga River Flood) येतो. मुरगूडला तर बेटाचेच स्वरुप येते. अलिकडे याचे प्रमाण वाढलेले असताना रस्ता करताना ठेकेदार कंपनीने याचा फारसा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही.

त्यामुळे यावर्षी रस्त्यावर महापुराचे पाणी आल्यानंतर वाहतूक ठप्प तर होणारच आहे. शिवाय मुरगूडजवळ महापुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. प्रतिवर्षी वेदगंगा नदीला महापूर येतो. मुरगूड शहरात येण्यासाठी मुदाळतिट्टा, निपाणी हे दोन महत्वाचे मार्ग आहेत.

त्याशिवाय चिमगांव,दौलतवाडी, भडगांव,वाघापूर या मार्गांचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण जोरदार पाऊस लागल्यास वेदगंगेला पूर येताच कुरणी - भडगांव,वाघापूर - मुरगूड या दोन पुलावर पहिल्यांदा पाणी येते. पूर्ण पावसाळ्यात किमान चार ते पाचवेळा चार - सहा दिवसांसाठी वाहतूक ठप्प होते. सरपिराजीराव तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर सांडव्यावरील पाण्यामुळे दौलतवाडीमार्गे येणारी वाहतूकही ठप्प होते.

मुरगूड स्मशानभूमीजवळील ओढ्यावर पाणी आल्याने येथेही मार्ग ठप्प होतो. शिंदेवाडीजवळ मसोबा मंदिराजवळील ओढ्यावर पाणी येते. त्यामुळे तोही मार्गही ठप्प होतो. परिणामी मुरगूडला बेटाचे स्वरुप येतो. ठेकेदार कंपनीने शिंदेवाडी येथील व मुरगूड येथील पूल या दोन पुलाचे रुंदीकरण करणे अपेक्षित असताना जैसे थे परिस्थिती ठेवल्यामुळे येथून पुराचे पाणी पास होण्यास अडथळे निर्माण होणार आहेत.

त्यामुळे पाण्याचा फुगवटा वाढणार आहे. हीच परिस्थिती शिंदेवाडीजवळ असल्याने याठिकाणीही गावात मोठ्याप्रमाणावर पाणी शिरणार आहे. यमगेपासून निढोरीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेली गटर अर्धवट अवस्थेत असल्याने त्याचाही मोठा परिणाम होणार आहे. यमगे,शिंदेवाडी, माधवनगर पर्यंतचा मार्ग सध्या अर्धवट आहे.त्यामुळे या परिसरात येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे वाहतूक लगेच बंद करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT