robbery in jotiba one women 8 lakh rupees theft from therfer in kolhapur 
कोल्हापूर

दर्शनासाठी डोंगरमाथ्यावर गेले आणि पर्समधील सोळा तोळे गमावून आले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर (कोडोली) : वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे देवदर्शनासाठी आलेल्या इस्लामपूर येथील महिलेच्या पर्समधील १६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार असे आठ लाखांचा ऐवज चोरट्याने पळविला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी  इस्लामपुरातील आर.आय.टी. कॉलनी येथील हेमलता अधिकराव पाटील या कुटुंबासमवेत रविवारी जोतिबा दर्शनासाठी आल्या होत्या. रविवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची जोतिबा डोंगरावरत मोठी गर्दी झाली होती.

हेमलता पाटील या काळ भैरव देवाचे दर्शन घेत असताना त्यांनी आपल्या गळ्यामध्ये अडकवलेल्या पर्समधील लहान पर्समध्ये ठेवलेले चार तोळ्यांच्या पाटल्या, लक्ष्मी हार, नेकलेस, नतनी, ब्रेसलेट, मनगटी मनी व रोख रक्कम १५  हजार रुपये असा ८ लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला. हेमलता पाटील या माहेरी रेठरे खुर्दला राहण्यास जाणार असल्याने घरातील सर्व १६ तोळे दागिने पर्समध्ये ठेवले होते. पुढील तपास कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT