Rs 500 fine for flouting rule in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांनो सावधान! नियम मोडल्यास आजपासून होणार मोठा दंड 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शहरात कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी महापलिका आणि पोलिस प्रशासन यांनी संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला असून मास्क न वापरणाऱ्या तसेच होम क्वांरनटाईन असतानाही घराबाहेर पडणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी 20 पथकांची नेमणूक केली आहे. आज रविवार असल्याने यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नसली तरीदेखील कारवाईची तयारी मात्र सुरु आहे. 

कोरोनाचा कहर शहर आणि जिल्ह्यात वाढतच आहे. शहरात दररोज 200 सरासरी रुग्ण सापडत आहेत. रुग्णांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगही सुरु असून आता त्याव्दारे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी बनवून त्यांच्याही तपासण्या केल्या जाणार आहेत. महापालिकेने यापुर्वी केएमटी कर्मचाऱ्यामार्फत कारवाई सुरु केली आहेच. त्याचबरोबर लोकांच्यावर प्रशासनाचा आणखीन जरब बसावा,यासाठी आता दंडाची रक्कम वाढविली असून पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.तसेच रुटींग कारवाईही यासोबत केली जाणार आहे. 

कोरोनाचा कहर वाढत असताना शहरात बेफिकीरीने फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून कांही कडक निर्णय घेतले आहेत. दरम्यान,केएमटी कर्मचाऱ्यांनी आज दिवसभरात 20 हजारावर दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांना या पथकाकडून शंभर रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते. उद्यापासून पोलिस आणि महापालिका यांच्या संयुक्त कारवाईत मात्र मोठा दंड आकारला जाणार आहे. 

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu on Uddhav Thackeray: 'पाठिंबा दिला म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री', बच्चू कडूंचे जशास तसे उत्तर

MS Dhoni चेन्नई सुपर किंग्सचा नवा प्रशिक्षक? R Ashwin चे मोठे विधान, स्टीफन फ्लेमिंगच्या उचलबांगडीची चर्चा; म्हणाला, तुम्हाला दुसरा...

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

SCROLL FOR NEXT