rumors of leopards coming in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात बिबट्या तर आलाच नाही, पण...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - येथील सुर्वेनगर परिसरात आज बिबट्या आल्याची अफवा समाजमाध्यमवरून पसरली आणि एकच गलका उडाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री केली असता या ठिकाणी बिबट्या आलेला नसून कुत्र्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. 

याबाबत सुर्वे नगर परिसरातून मिळालेली माहिती अशी,  आज रात्रीच्या वेळी परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यावर तसेच एका दुभत्या जनावरावर बिबट्याने हल्ला केल्याची हुल उठली. अनेकजण सुर्वे नगरातील परिसरात बिबट्या आल्याचे एकमेकांना सांगू लागले. यात काहींनी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले, असे सांगत या ठशांचे फोटोही काढले. याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच करवीर विभागाचे वनपाल विजय पाटील यांच्यासह वनरक्षकांची पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला तसेच काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या निश्चित बघितल्याचे सांगणारे कोणीही पुढे आले नाही. ज्या ठिकाणी बिबट्या आल्याचे सांगण्यात येत होते, त्या ठिकाणचे ठसे कोणते आहेत हे ही वनविभागाच्या पथकाने तपासून पाहिले असता हे ठसे मोकाट कुत्र्याच्या पावलांचे असल्याचे समजले. या भागात बिबट्या आलेला नसल्याची खात्री झाल्यानंतर वनविभाग पथक माघारी परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

२ वर्ष चांगली चालली अन् वाहिनीने अचानक बंद केली लोकप्रिय मालिका; प्रेक्षक संतापले, म्हणतात- काय मूर्खपणा...

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Nepalese Jhol Momo Recipe: झणझणीत, आंबट आणि शेंगदाण्याच्या चवीचे, नेपाळचे खास झोल मोमो एकदा नक्की ट्राय करा

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT