कोल्हापूर

'ACB'ची धडक कारवाई; 15 हजाराची लाच घेताना पोलिस नाईक जाळ्यात

लाचलुचपत कायद्याअंतर्गत पोलिस नाईक सागर कोळी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लाचलुचपत कायद्याअंतर्गत पोलिस नाईक सागर कोळी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर - वादातील इनोव्हा गाडी परत मिळवून देतो असे सांगत १० हजाराची लाचेची मागणी करणारा पोलिस नाईक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला आहे. शहरातील शाहुपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सागर इराप्पा कोळी (रा. उचगाव ता. करवीर) यास लाच घेताना रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत कायद्याअंतर्गत पोलिस नाईक सागर कोळी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेली माहिती अशी, तक्रारदाराची वादातीत इनोव्हा गाडी परत मिळवून देतो असे सांगत, पोलिस नाईक कोळी याने तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याने आधी १० हजार रुपये घेतले होते. उर्वरित रकमेसाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. कोल्हापूर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बम्बर्गेकर यांच्या पथकाने सापळा रचला. काल (मंगळवार) पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना सागर कोळी याला रंगेहाथ पकडले. पोलिस नाईक कोळी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT