कोल्हापूर

रंकाळ्याच्या पाण्याची पातळी उतरली

प्रतिनिधी

कोल्हापूरः रंकाळा तलावात सांडपाणी मिसळणे बंद झाल्याचा परिणाम म्हणून यावर्षी तलावाच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. राजघाट, दुतोंडी घाटाच्या बाजूने पाणी उतरल्याचे चित्र नजरेस पडते. 
देवकर पाणंदच्या पाठीमागून मिसळणाऱ्या ओढ्यातील सांडपाणी तलावात मिसळणे बंद झाले आहे. क्रशर चौकालगत या पाण्यावर प्राथमिक प्रक्रिया होते. नंतर ड्रेनेजलाईनमधून सांडपाणी थेट दुधाळी एसटीपीच्या दिशेने जाते. सरनाईक कॉलनी येथून पूर्वी थेट सांडपाणी तलावात जात होते. हा स्तोत्रही बंद झाला आहे. 
गेल्या वषी महापूरावेळी रंकाळ्याचे उग्र स्वरूप दाखविले. 2005 ला रंकाळा तलावाचे पाणी बाहेर पडले होते. गेल्या वर्षी अशीच स्थिती निर्माण झाली होती. भर पावसात पाणी रंकाळ्याचया कठड्याला धडकले मात्र त्याने हद्द काही सोडली नाही. मध्यंतरी पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्यानंतर पाण्याची पातळी वर्षभर कायम राहणार नाही याची जाणीव झाली. 
नंतर पुढे दोन महिने परताळ्याच्या बाजूने पाणी नदीच्या दिशेने गेले. एप्रिल मे मध्ये दरवर्षी पाण्याची पातळी कमी होते. उन्हाची तीव्रता जशी वाढत जाते पाण्याची पातळी कमी होत जाते. पुर्वी सांडपाण्यामुळे पावसाने साठलले पाणी कुठले आणि सांडपाणी कुठले हे ओळखणे मुश्‍कील व्हायचे. 
यावर्षी मात्र तलावाभोवती कडठ्याचे निरीक्षण केल्यास किमान पाच फूटाने पातळी कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. शाहू स्मृती उद्यानाच्या बाजूने असलेल्या तलावाच्या परिसरात वाऱ्याच्या वेगाने हेलकावे मारणारे पाणी पाहून मनाला समाधान मिळते. त्याचवेळी पाण्याचा पातळी इतकी कमी कशी काय झाली. असा प्रश्‍नही पडतो. 

संचारबंदीमुळे पर्यटकांची पाठ 
सध्या लॉकडाऊनमुळे रंकाळा तलावाचा परिसर सन्नाटा अनुभवतो आहे. संचारबंदीमुळे गेले महिनाभर रंकाळा प्रेमी नागरिकही आणि फिरायला येणारी मंडळीही इकडे फिरकलेले नाहीत. पर्यटकांचाही ओढा कमी झालेला आहे. अशा स्थितीत सायंकाळी मंद वाऱ्याच्या साक्षीने कमी झालेली पाण्याची पातळी पाहताना रंकाळ्याचे मूळ स्वरूप समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Minister Statement : ''राजकीय गरज म्हणून जाहीर केल्या अनेक योजना; आता पूर्ण करणं कठीण'', भाजप मंत्र्याची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ!

Satej Patil : 'दोरी तुटली, आता बांध ही स्वतंत्र झाले'; हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले सतेज पाटील?

Budh Gochar 2025: वर्षातील शेवटचे गोचर 'या' 3 राशींचे भाग्य बदलू शकते, जीवनात दिसून येतील अद्भूत बदल

Shalinitai Patil: 'शालिनीताई पाटील यांना अखेरचा निरोप'; सातारारोड येथे अंत्यसंस्कार, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण!

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तुमच्या शहरातील ताजा भाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT