कोल्हापूर

Sakal Impact - रंकाळ्याचा सांडवा झाला रिकामा; अधिकाऱ्यांकडून पाहणी

सांडव्याच्या ठिकाणी मॅन्युअल ऑपरेटर गेट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- राजेंद्र पाटील

कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलावातील सांडव्याचा भराव काढण्याचे काम पालिका प्रशासनाने सुरु केले. याशिवाय सांडव्याच्या ठिकाणी मॅन्युअल ऑपरेटर गेट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तलावातील सांडव्याचा भरावच काढला नसल्याने रंकाळा तलाव ओव्हर फ्लो झाल्याची बातमी ‘सकाळ’ने छायाचित्रासह बुधवारी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत पालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी अधिकाऱ्यांसह आज रंकाळा सांडव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सांडव्याचा भराव दूर करण्याच्या सूचना दिल्या.

पूर्वी रंकाळा हे धरण समजून त्याच्या पाण्याच्या उद्‍भवाची व निर्गतीची उत्तम व्यवस्था केली होती. पूर्वी फरशी पुलावरून पावसाळ्यात रंकाळा पूर्ण क्षमतेने भरला की वाहायचा. हे पाणी नैसर्गिकरित्या फुलेवाडीकडील ओढ्यातून पंचगंगेत जायचे. सांडव्यावरून किंवा पाटाने वाहणारे पाणी शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरण्यात यावे यासाठी करवीर संस्थानाच्या छत्रपतींनी ४ डिसेंबर १८९७ ला वटहुकूम प्रसिद्ध केला होता. पावसाळ्यात रंकाळ्यातील अतिरिक्त पाणी बाहेर पडायचे. प्राचीन संदर्भामध्ये याला संजीवनी नदी असेही म्हटले आहे. फरशीवरच्या जागेत आता पूल व पाण्यासाठी सांडवा बांधला आहे. या सांडव्याच्या चरीमधील भराव यावर्षी काढला नाही. सांडव्याखाली दगड-गोटे तसेच राहिले त्यामुळे रंकाळा ओव्हर फ्लो होण्यासाठी हे एक कारण ठरले.

सांडव्याच्या बाजूकडील चरीची खोली वाढवण्यात येईल. पावसाळ्यात पाणी वाहून जावे व उन्हाळ्यात पाणी वाहून जाऊ नये, यासाठी मॅन्युअल ऑपरेटर गेट केले जाईल. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, कोल्हापूर महानगरपालिका

सांडव्याखाली असणारे दगड-गोटे हटवावेत. सांडव्यापुढील नाला स्वच्छ करावा. सांडव्याच्या ठिकाणी करण्यात येणारे गेट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावे. रंकाळ्याचा ऐतिहासिक बाज व वैभव कायम राहायला हवे.

- अजय कोराणे, अध्यक्ष, आर्किटेक्ट असोसिएशन कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT