Salute to the stubborn Casa grandmother Laddu business to the Charmakar community 
कोल्हापूर

कासा आज्जीला जिद्दीला सलाम : लाडूमुळे मिळाला चर्मकार समाजाला व्यवसाय

निवास मोटे

पोहाळे तर्फ आळते  (कोल्हापूर)  : येथील श्रीमती कासाबाई तुकाराम मोरे या महिलेने तीस वर्षांपूर्वी आपल्या घरामध्ये चिरमुरे, राजगिरे हे लाडू करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता पंचवीस तीस वर्षात हाच लाडू गावातील चर्मकार समाज करु लागला आणि या समाजाचा उदरनिर्वाह हा लाडूच बनला. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा हा लाडू श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर करवीर निवासिनी महालक्ष्मी, संत बाळूमामा आदमापूर, मालेश्वर गणपतीपुळे या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू जाऊ लागला. या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाले . याच या पोहाळेतील लाडूची ही गोड गोष्ट.. 

तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते हे जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव. गावात सर्वच समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. याच गावांमध्ये चर्मकार समाजाची पंचवीस-तीस कुटुंब आहेत. त्यातील बहुतांशी कुटुंबीय या व्यवसायाकडे वळली आहेत .केवळ कासाआजी मुळे हा लाडू व्यवसाय प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ह्या आजीने आपल्या घरी थोडे चिरमुरे , राजगिरे आणून लाडू करण्यास सुरुवात केली. व त्याची विक्री गावोगावी करण्यास सुरुवात केली .या लाडवाची  चव अनेकांच्या तोंडात बसली हा लाडू लहान मुलांना, वयोवृद्धांना हवाहवासा वाटू लागला. हा लाडू करण्याचे काम कासाआजीने हळू हळू वाढवले. तिने बांबूची पाटी (बांबूची डोली ) घेऊन ती दारोदारी फिरू लागली व आपला लाडू विकू लागली आणि तिने या लाडवावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला .


 कासा आजीचा कित्ता चर्मकार समाजातील अनेकांनी घेऊन आपणही व्यवसाय सुरू केला. या समाजातील नव्वद टक्के लोक हा व्यवसाय करतात. आता हा लाडू तर कोल्हापूर सांगली कोकण या भागात घरोघरी पोहोचला आहे.  या लाडू मुळेच पोहाळे गावचे नाव नावारूपास आले आहे. या समाजातील ९०% लोक लाडू व्यवसाय करतात तर इतर १० टक्के लोक शेती, नोकरी करतात. त्यांच्या घरातील दहा वर्षाच्या मुलापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धां पर्यंत त्यांचे हात या व्यवसायात गुंतले आहेत. सर्वच कुटुंबे ही कामे आवडीने  करतात . 

स्वच्छता नीटनेटकेपणा . चांगल्या चवीमुळे पोहाळेतील लाडवास मागणी आहे. दिवसेंदिवस  हा लाडू दूरवर जाताना दिसत आहे. श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर, करवीर निवासिनी महालक्ष्मी, आदमापूर गणपतपुळे मारलेश्वर ,याठिकाणी हा लाडू प्रसाद म्हणून भाविक घेतात. पुणे मुंबईचे भाविक दर जोतिबा डोंगरावर आल्यावर हा लाडू मोठया प्रमाणात घरी घेऊन जातात . कोल्हापूरी गूळामुळे लाडू फार चवदार लागतो  म्हणून त्यास मोठी मागणी आहे .
 लाडू तयार करण्यासाठी कष्ट  फार आहे. गुळ गरम करणे, चिरमुरे स्वच्छ करणे मोठया कढईत गुळाचे पाणी करून त्यात चिरमुरे टाकून लाडू बनविणे   राजगिरा आणून त्यांच्या लाह्या तयार करणे  लाडू तयार केला जातो. लाडू  तयार करण्याचे  काम महिलाच करताना दिसतात. पुरुष मंडळी दररोज बाजारपेठेत या लाडवाची विक्री करतात. एकूणच या समाजाच्या जीवनात या लाडवा मुळेच अमुलाग्र बदल झाला . लाडूच त्यांच्या जीवनाचा आधार बनला आहे . 

कासा आजीविषयी ..
कासाबाई मोरे तथा कासा आजी या सध्या नव्वदीत पोहोचल्या आहेत. त्यांची वयामुळे स्मरणशक्ती कमी झाली आहे. तरीही या वयात  पेलल तसे लाडू करण्याचे काम त्या आजही करतात. आजीला हा व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला फार त्रास झाला पण आजी सर्वांना पुरून उरली आणि तिने लाडवा बरोबर गावचे नावे ही उज्वल केलं.


आमच्या आजी कासाबाई यांनी प्रथम लाडवाची निर्मिती केली आणि हा लाडू व्यवसाय पोहाळेत सुरू झाला. यावरच आमचे कुटुंब जगते तोच आमच्या जीवनाचा आधार आहे.

 सौ.पूजा भिकाजी मोरे (लाडू व्यवसायिक ) कासा आजीची नात सून ,.पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा

 संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT