Samarjeetsinh Ghatge Reply to Hasan Mushrif google
कोल्हापूर

कागलचं राजकारण तापलं; समरजीतसिंह घाटगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

राजकारणासाठी श्रीराम मंदीराचा वापर -समरजीत घाटगे यांच्यावर मुश्रीफ गटाचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

कागल (कोल्हापूर) : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील राजकारण सध्या तापलयं. गेल्या आठवड्यात भाजपा नेते समरजीतसिंह घाटगे (Raje Samarjeet singh Ghatge) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत श्रीरामाचा उल्लेख असल्याचा आक्षेप घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. तर आज हसन मुश्रीफ यांच्या गटाने कागल (Kagal) मधील श्रीराम मंदीराचा वापर समरजीत घाटगे यांच्याकडून राजकारणासाठी होत असल्याचा आरोप केला आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले असून, गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढला आहे. यावरून कागलमध्ये वातावरण तापलं आहे.

श्रीराम मंदीराचा वापर समरजीत घाटगे यांच्याकडून राजकारनासाठी होत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढला आहे.

पंचांगानुसार २४ मार्च १९५४ रोजी रंगपंचमी दिवशी जन्मलेले हसन मुश्रीफ हे श्रीराम नवमीला आपला जन्म झाल्याचे सांगून बहुजन समाजाला गेली चाळीस वर्षे फसवत असल्याचा आरोप समरजीतसिंह घाटगे यांनी केला होता. गोकुळ दूध संघामध्ये मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद हे संचालक आहेत. वाढदिवसाच्या पुरवणीमध्ये गोकुळ दूध संघाने दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावात काही अक्षरांचा वापर करून 'राम' असा एकेरी उल्लेख केला असल्याचेही ते म्हणाले होते.

मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या कारखान्याच्या मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावातील पॅन कार्डवर व त्यांच्या वेबपेजवर त्यांची जन्मतारीख २४ मार्च १९५४ अशी आहे. बहुजन समाजाला गेली चाळीस वर्षे ते फसवत आहेत. श्रीराम मंदिरासाठी पंधरा हजार रुपये राजेंनी दिल्याचे सांगून त्यांनी स्व.राजेंचा अपमान केला आहे. राम मंदिराच्या जागी आमचा वाडा होता हे विसरून चालणार नाही. तो वाडा पाडला आहे. मंत्री मुश्रीफ यांनी धर्मासाठी आपली एक गुंठातरी जागा दिली का? हे सांगावे. राममंदिरला दिलेले हे शासनाचे पैसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आज मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT