Sambhaji-Bhide Sakal
कोल्हापूर

मोदींच्या वक्तव्यावर भिडे गुरुजी म्हणतात, 'दोघांनीही लोकांना...'

मोदींच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अनेक नेत्यांकडून मोदींच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, या वादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी देखील उडी घेतली असून, 'काँग्रेस आणि पंतप्रधानांनी एकत्र बसून लोकांना सत्य सांगावे' असा सल्ला भिडे गुरुजी (Sambhaji Bhinde ) यांनी दिला आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. याबाबत न्यूज 18 लोकमतने वृत्त प्रकाशित केले आहे. (Sambhaji Bhide On Modi Comment)

काँग्रेस करणार 'माफी मांगो' आंदोलन

दरम्यान, मोदींच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी काँग्रेसतर्फे (Maharashtra Congress) भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर 'माफी मांगो' आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही महाराष्ट्राची माफी मागावी असे फलक घेऊन उभे राहणार आहोत, असे पटोले म्हणाले आहेत.

पटोले म्हणाले की, पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती देशाची असते, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाल्याने मनाला तीव्र दुःख झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानपदावर बसलेले व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत असल्याचे सांगत, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, भाजपने आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली. देशाला दिशा देण्याबरोबरच देशाला मदत करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे.

मास्क न वापरण्याचा दिला होता सल्ला

यापूर्वी भिडे गुरुजी यांनी नागरिकांना कोरोना काळात मास्क वापरू नका, असा सल्लाच दिला होता, तसेच ज्या लोकांना कोरोना होतो ते नपुंसक असतात, असा दावाही केला होता. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT