sambhaji raje chhatrapati comment on maratha reservation 
कोल्हापूर

राज्य सरकार मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडेल ; संभाजीराजे 

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - आज होणाऱ्या सुनावणीत आरक्षणावरील स्थगिती उठेल असा विश्वास व्यक्त करत सुनावणीसाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाली असून सरकार मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडेल असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे. 

मराठा आरक्षण प्रकरणी आज दुपारी दोन वाजता सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्यातर्फे न्यायालयात मांडली जाणार आहे. याच पार्श्वभूमिवर खासदार संभाजीराजे आज माध्यमांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसींचे आरक्षण काढून घेण्याचा संबंधच नसल्याचे सांगत आमचा लढा हा मराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण मिळावा यासाठी आहे, अशी भूमिका स्पष्ट केली.  मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय झाल्याचे मतही यावेळी संभाजीराजे यांवी व्यक्त केले. 

‘एसईबीसी’ प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. आरक्षणावर दिली गेलेली स्थगिती उठवण्यासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे अनेक दिवसांपासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया व नोकर भरती प्रक्रिया रखडली. आता सर्वांचे लक्ष असलेल्या अर्जावर सुनावणी होत आहे. या सुनावणीत ॲड. संदीप देशमुख आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी हे बाजू मांडणार आहेत.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT