sambhaji raje chhatrapati order to kolhapur collector 
कोल्हापूर

संबंधितांवर कारवाई करून अहवाल द्या : संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा

राशिवडे : म्हासुर्ली पैकी धनगरवाड्यावर रस्ता करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून गैरव्यवहार झाल्याचे ‘सकाळ’च्या बातमीवरून पुढे आले. याची तातडीने चौकशी करून ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व तसा अहवाल मला द्यावा, अशा आशयाचे निवेदन आज खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांना दिले आहे. 

म्हासुर्ली पैकी पादुकाचा धनगरवाडा, मधला धनगरवाडा व मधला धनगरवाडा ‘अ’ या तीन धनगर वाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गेल्याच वर्षी खासदार संभाजीराजे यांनी या रस्त्यांना दळणवळणासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पैकी ३० लाख रुपये प्रत्यक्ष खर्ची पडले आहेत. केवळ माग पाडण्यापलीकडे काहीही झालेले नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार जेमतेम चार ते पाच लाख रुपयांचे काम झाले आहे. तर दुसरीकडे मानेवाडीकडून नियोजन मंडळाकडून दहा लाख रुपयांचा निधीही रस्त्यावर खर्च झाला आहे. याचेही केवळ माग पाडले आहेत. याबाबत आज ‘सकाळ’मध्ये आलेल्या वृत्तातून ही बाब पुढे आली. याची दखल घेऊन तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

‘येथील दुर्गम परिसराचा विचार करून मी निधी दिला होता; मात्र तो खर्ची पडल्यानंतरही एक मुलगा व मातेसह बाळाचा मृत्यू होतो हे दुर्दैवी असून, माणुसकीला धक्का देणारी बाब आहे,’ असेही या निवेदनात म्हटले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

उद्धव ठाकरेंची निरोपाच्या भाषणात टोलेबाजी! PM मोदींपासून DyCM शिंदेंपर्यंत, सिलिंडर ते रेडा; कवितेतून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT