कोल्हापूर

कोल्हापूर महापुराचा प्रश्‍न राज्यसभेत; संभाजीराजेंची विचारणा

पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही पूर ओसरण्याचा वेग हा प्रचंड कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली शहरांमध्ये आलेल्या पूराच्या पाण्याचे निस्सारण वेगाने व्हावे याकरिता कोणत्या उपाययोजना केल्या जातील, अशी विचारणा खासदार संभाजीराजे (sambhaji raje) छत्रपती यांनी आज राज्यसभेत केली. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पूरस्थिती व जलनिस्सारण व्यवस्थापनाचा आराखडा करून कोल्हापूर (kolhapur) व सांगली (sangli) महापालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करावा असे उत्तर देताना केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी (hardipsing puri) यांनी दिले.

कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) या जिल्ह्यांना महापूराचा सामना करावा लागला. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही पूर ओसरण्याचा वेग हा प्रचंड कमी आहे. पूर ओसरण्याचा वेग मंदावल्यामुळे अजूनही अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. (kolhapur flood) यामुळे शहरांतील जलनिस्सारण व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत कोणती उपाययोजना केली अशी विचारणी संभाजीराजे यांनी राज्यसभेत केली.

अतिवृष्टीमुळे येणाऱ्या पूराच्या पाण्याचे निस्सारण करण्याचा दृष्टीने आवश्यक ती व्यवस्था उभारण्यासाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी दिला जातो, असे सांगत या निधीच्या माध्यमातून स्थानिक शासन संस्थेने त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे असते, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. आज संसदेचे कामकाज फार कमी वेळ चालू शकले. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून प्रचंड गदारोळ सुरू असल्याने राज्यसभा तीन वेळा तहकूब करावी लागली. मात्र राज्यसभेच्या दुसऱ्या सत्रात वेळ मिळताच प्रश्नोत्तराच्या प्रहरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ

Latest Marathi News Updates : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी; राष्ट्रपती भवनमध्ये सोहळा

बार्शी तालुका हादरला! 'शेतकऱ्याने मानसिक त्रासातून संपवले जीवन'; पत्नीस शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी, त्रास असाह्य झाला अन्..

Hong Kong Open 2025 : आयुषचा जागतिक पदक विजेत्याला धक्का; पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT