sand  sakal
कोल्हापूर

सावधान... वाळू उपसा करताय ; जिल्हाधिकाऱयांचा कठोर कारवाईचा इशारा

प्रतिब्रास पाच पट होणार दंड

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई (Punitive action)केली जाणार आहे. वाळूचा प्रतिब्रास (SAND EACH BRASS RATE)६ हजार ६५४ रुपये दर आहे. हीच वाळू बेकायदेशीर उपसली किंवा वाहतूक केली तर प्रतिब्रास पाचपट दंड व रॉयल्टीची रक्कम अशी एकूण प्रतिब्रास ३३ हजार ८७० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासह इतर गौण खनिजांवरही दंडाची रक्कम निश्‍चित केली आहे.

जिल्ह्यात काळा दगड, नदीतील वाळू, कृत्रिम वाळ, मुरूम, माती, सीलिका सॅन्ड, जांभा, चिरा दगड, खडी व ग्रीट अशा गौण खनिजांची बेकायेदशीर उत्खनन आणि वाहतूक केली जात आहे. महसूल अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच किंवा रॉयल्टी न भरताच हा उद्योग सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. काही ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच व्यवसाय सुरू आहे. याला आळा बसवा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी(kolhapur collector) बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांना वेळेत सुधारण्याचा इशारा दिला आहे. बेकायदेशीर वाहतूक किंवा उत्खनन होत असल्यास कारवाई करण्याचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना आदेश दिले आहेत. उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही कारवाईच्या सूचना प्रशासनाकडून (kolhapur administration)दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT