Uddhav Thackeray Sanjay Pawar esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यावर ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी, पवारांची उपनेतेपदी केली निवड

गेली ३५ वर्षे पवार शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची कट्टर शिवसैनिक म्हणून राज्यभर नवी ओळख निर्माण झाली.

कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाच्या राज्यातील दहा उपनेत्यांमध्ये कोल्हापूरचे जिल्‍हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांची निवड झाली आहे. हे पद म्हणजे त्यांची पदोन्नतीच आहे. स्वाभिमानी शिवसैनिक (Shiv Sena) म्हणून त्यांची ओळख आहे.

गेली ३५ वर्षे ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहिले आहेत. पवार यांनी यापूर्वी करवीर तालुका प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. पंधरा वर्षे ते कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक होते. राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची कट्टर शिवसैनिक म्हणून राज्यभर नवी ओळख निर्माण झाली.

उपनेतेपद मिळाल्यामुळे आता त्यांच्या अधिकारात आणखी वाढ झाली आहे. विजय साळवी (कल्याण), संजय जाधव (परभणी), संजय पवार (कोल्हापूर), राजूल पटेल (मुंबई), शरद कोळी (सोलापूर), अस्मिता गायकवाड (सोलापूर), शुभांगी पाटील (नाशिक), जान्हवी सावंत (कोकण) आणि छाया शिंदे (सातारा) यांची उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT