Sanjay Singh Gaikwad car story by sandeep khandekar
Sanjay Singh Gaikwad car story by sandeep khandekar 
कोल्हापूर

कार्यकर्त्यांचा आग्रहच फार गायकवाड यांची सगळी वाहने नऊ चार चार चार

संदीप खांडेकर

 कोल्हापूर :  संजयसिंह गायकवाड शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार. काँग्रेसमधील राजकारण पाहिलेले नेते. वाड्या-वस्त्यांतला त्यांचा जनसंपर्क कौतुकाचा विषय होता. कट्टर कार्यकर्त्यांचा गट त्यांच्यासाठी दिवस-रात्र राबला. बंडखोरी करून पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले. बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्यावर त्यांनी केलेली मात तालुक्‍यात चर्चेत आली. नेत्यावरील प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी त्यांना जीप भेट दिली. तिचा नंबर ९४४४ घेण्यात आला. गायकवाड घराण्यात आजही हाच नंबर घेतला जातोय. नंबरचा अंकांच्या बेरजेशी काही संबंध नाही. केवळ पहिल्या गाडीला तो नंबर आहे म्हणून हा नंबर घेण्याची प्रथा घराण्यात पडली आहे. 

शाहूवाडी तालुका १९५० मध्ये १३१ गावांचा होता. विधानसभा मतदारसंघ म्हणून तो १९५२ मध्ये अस्तित्वात आला. त्याची पुनर्रचना २००९ मध्ये शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ अशी झाली. तत्पूर्वी उदयसिंहराव गायकवाड, बाबासाहेब पाटील, संजयसिंह गायकवाड यांची तालुक्‍याच्या राजकारणात छाप होती. उदयसिंहराव गायकवाड लोकसभेच्या राजकारणात शिरल्यानंतर बाबासाहेब पाटील १९८० मध्ये आमदार झाले. संजयसिंह गायकवाड सुपात्रेचे. त्यांनी १९८५ मध्ये काँग्रेसमधून बंडखोरी केली. विधानसभेच्या राजकारणातील लढत प्रतिष्ठेची ठरली. निवडणुकीत ते विजयी झाले. त्याच वर्षी जीपची भेट त्यांना कार्यकर्त्यांकडून मिळाली. मतदारसंघातल्या गावा-गावांतली धूळ जीपच्या चाकांना लागली. गाडीचा नंबर मतदारांच्या लक्षात राहील, असा होता. नव्या मार्शल करता हाच नंबर ठेवण्यात आला.


त्यांना १९९०च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्याची फारशी पर्वा त्यांनी केली नाही. पुन्हा मतदारसंघातला फेरफटका वाढवला. त्यांनी १९९५ च्या निवडणुकीत बाजी मारली. तोच कित्ता पुढे १९९९ च्या निवडणुकीत गिरवला. बोलेरो, सफारी त्यांच्या दौऱ्यासाठी तैनात झाल्या. दोन्ही गाड्यांसाठी पूर्वीचाच क्रमांक घेण्यात आला. त्यांचे दुर्दैवाने २००० मध्ये निधन झाले. पत्नी संजीवनीदेवी गायकवाड यांना पोटनिवडणुकीत मतदारांनी कौल दिला. प्रचाराकरिता त्यांना ९४४४ नंबरच्या गाड्या आधार ठरल्या. दोन वर्षांत गावां-गावात विकास कामे करण्यासाठी त्यांनी दौरे केले. 


मुलगा कर्णसिंह यांचा वाड्या-वस्त्यांतला प्रवास याच गाड्यांतून आजही होतो. त्यांचाही राजकीय प्रवास सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याचे त्यांनीही प्रयत्न केले. शाहूवाडीतला एक मतदार वर्ग आजही त्यांना मानणारा आहे. संजीवनीदेवी गायकवाड माजी आमदार आहेत. त्यांच्याकडे अडी-अडचणी सोडविण्यासाठी तो आजही आग्रह धरतो. संजयसिंह गायकवाड यांनी वाड्या वस्त्यांवरील लोकांत निर्माण केलेला विश्वास कायम असल्याचे चित्र आहे. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: कन्हैय्या कुमार यांचा धर्मांतर करा असे सांगणारा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल, वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT