kolhapur esakal
कोल्हापूर

जोतिबाची यात्रा पूर्ण क्षमतेने होणार; पालकमंत्र्यांची घोषणा

प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर): दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा पूर्ण क्षमतेने होणार असल्याची अधिकृत घोषणा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी जोतिबा डोंगरावर (Jyotiba Tempal) आढावा बैठकीत केली. यात्रा यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, भाविक, ग्रामस्थ व पुजारी यांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. या यात्रेत भाविकांना कोणतेही निर्बंध नसणार आहेत. त्यामुळे यंदा या यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याचा प्रशासनाने अंदाज व्यक्त केला आहे.

कोरोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे चैत्र यात्रा झाली नाही. यंदा यात्रा काळात सलग सुट्टीचे दिवस असल्यामुळे मोठी गर्दी वाढेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार तयारीचे सर्व नियोजन सुरु होणार आहे. दरम्यान, आढावा बैठकीमध्ये सर्व शासकीय विभागांचा आढावा घेण्यात आला. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच डोंगरावर विविध कामांसाठी परवानगी द्या अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपातील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरून दर्शन रांग लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे. या दर्शन मंडपात जाऊन पालकमंत्र्यांनी पाहणी करून यंत्रणेस सूचना दिल्या. कोणत्याही भाविकाला इजा होता कामा नये त्यानुसार या दर्शनमंडपात रांगेत बॅरिकेड्स लावून काळजीपूर्वक नियोजन करा अशा सूचना त्यांनी देवस्थान समितीच्या प्रशासनास दिल्या.

बैठकीमध्ये डोंगरावर जी खाद्य पदार्थांची विक्री होते, ज्यांचा परवाना आहे त्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे. मंदिर परिसरात दर्शन रांगेचे नियोजन ,बैठकीत येण्या-जाण्याचे मार्ग, पार्कींग, बंदोबस्त अरोग्य पाणीपुरवठा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मंदिर परिसरात अनावश्यक रेलिंग काढल्यामुळे मंदिर परिसर मोकळा झाला आहे या कामाबद्दल बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT