Satej Patil ready discussions on the topic of Direct Pipeline Scheme 
कोल्हापूर

सतेज पाटील 'या' विषयावर समोरासमोर चर्चेस तयार....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेसाठी कोणी काय केले, याची चर्चा करण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील बिंदू चौकात एका व्यासपीठावर समोरासमोर येण्यास तयार आहेत. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांनी या व्यासपीठावर येऊन त्यांनी या योजनेसाठी काय योगदान दिले, किती परवानग्या मिळवून दिल्या. किती बैठका घेतल्या याची जाहीर माहिती द्यावी, असे आव्हान महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह महापालिकेतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले आहे. थेट पाईपलाईन योजनेच्या काम करण्यास सतेज पाटील, हसन मुश्रीफ व महापालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवकांना जनतेचे आशिर्वादच पुरेसे आहेत, असेही यावेळी देशमुख सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी शहरात विकासकामाला निधीच दिला नाही

थेट पाईपलाईनवरुन सध्या महाडिक विरुध्द पाटील असा सामना रंगला आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ‘‘विकासाचा कोणताही मुद्दा या विरोधकांकडे नसल्याने ते आता चुकीचे आरोप करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत महापालिका निवडणुकीपुर्वी या योजनेचे काम पुर्ण करण्याचे आमचे प्रयत्न राहतील. थेट पाईपलाईन झाली तर आम्ही निवडणूक लढणार नाही, असे वक्तव्य विरोधकांनी केले असून त्यांनी निवडणूक लढवावीच, अशी आमची इच्छा असून जनता त्यांना योग्य जागा दाखवून देणार आहे. शाहू समाधीस्थळालाही निधी दिला नाही : आदिल फरास आदिल फरास म्हणाले, ‘‘तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात विकासकामाला निधीच दिला नाही. अनेकदा मागणी करुनही शाहू समाधीस्थळासारख्या कामालाही त्यांनी पैसे दिले नाहीत. राजकारण करताना शाहूंचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या समाधीच्या कामालाही पैसे द्यायचे नाहीत, असे काम चंद्रकांत पाटील यांनी केले आहेत. ध्वनी यंत्रणा लावू नका म्हणून अनेक मंडळांना त्यांनी देणग्या दिल्या, पण शाहू समाधीस्थळाच्या कामाला पैसे दिले नाहीत. मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेऊन विकासकामे करतात म्हणून ते हजारोंच्या लीडने निवडून येतात. लाखोंच्या लिडने पराभूत होत नाहीत, अशी टिपण्णीही फरास यांनी केली. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील नगरसेवक भूपाल शेटे, गणी आजरेकर आदी उपस्थित होते. कदमांनी जागा लाटली : देशमुख कदमवाडी रि.सं.नंबर ७५४ ही राज्य शासनाची जागा सुनील कदम यांनी लाटली आहे. त्यामुळे त्यांना इतरांवर आरोप करण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर रंकाळ्यासमोरील वॉटरफ्रंट या इमारतीतील किती गाळ्यांचे भाडेकरार महापालिकेला दिले आहेत, त्याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, असे सांगून शारंगधर देशमुख म्हणाले, हॉटेल सयाजीमुळे शहरातील १२०० जणांना रोजगार मिळाला आहे.याचा विसर विरोधकांना पडतो.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला का निधी आणला नाही ? :

सचिन चव्हाण माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण म्हणाले, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रति मुख्यमंत्री म्हणून ओळखले जायचे.त्यांच्याकडे महसूलसारखे महत्वाचे खातेही होते. पण त्यांनी त्या ताकदीने कोल्हापूरला निधीच आणला नाही. याउलट गेल्या दोन महिन्यांत सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी ४७ कोटींचा निधी देऊन विकासाची गती कशी असावी, हे दाखवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT