satej patil stand against mahadik in gokul election kolhapur marathi news
satej patil stand against mahadik in gokul election kolhapur marathi news 
कोल्हापूर

 ‘गोकुळ’ हा त्यांचा ‘धंदा’ - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) ठराव कोणी स्वतंत्र दिले असले तरी एका विचाराने आम्ही एकत्र येणार आहोत. ‘गोकुळ’ हा सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. गेली २० वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी धंदा म्हणून या संघाकडे बघितले आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांच्याशी समझोता नाहीच, अशी स्पष्ट भूमिका गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे स्पष्ट केली.

महाडिकांसोबत समझोता नाहीच

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ज्या ज्येष्ठ संचालकांनी बंड पुकारले आहे, त्यांच्याशी आपली कोणतीही चर्चा झालेली नाही; परंतु काही गोष्टी त्यांनाही चुकीच्या वाटल्या असतील म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल. ते संचालक २५ वर्षे त्यांच्यासोबत होते. एवढ्या वर्षांचे सोबती तुम्हाला का सोडून जातात, याचे चिंतन त्यांनी करणे गरजेचे आहे.’’

ते म्हणाले, ‘‘ज्या महाडिकांनी गेली २० वर्षे धंदा आणि व्यवसाय म्हणून ‘गोकुळ’ वापरला, त्याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतीत समझोता किंवा चर्चेचा विषयच येत नाही, येणार नाही, हे स्पष्टच आहे. आमचा लढा सुरू आहे, तो मल्टिस्टेट विरोधात होता. त्यात त्यांनी माघार घेतली. स्कॉर्पिओ गाड्या वापरू नयेत, ही आमची भूमिका आहे. हे कशासाठी तर दूध उत्पादकाला दोन रुपये जास्त मिळावेत, ही त्यामागची भूमिका आहे. कुणाच्या ताब्यातून संघ काढून घेणे, हा माझा उद्देश नाही. तो संघ सभासदांच्या मालकीचा करणे हा उद्देश आहे. महाडिक यांच्याविरोधात आम्ही लढतोय. त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय, गोकुळचा घेतलेला गैरफायदा याविरोधात आमचा लढा आहे. त्यामुळे त्यांच्याशी समझोता करण्याचा किंवा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रश्‍नच येत नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT