Nipani Police Crime News esakal
कोल्हापूर

धक्कादायक! रस्त्यावरुन फरफटत नेत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून; पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी निपाणी शहर पोलिस (Nipani City Police) संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

साकीब आठवीत शिकत होता. त्याला दगडाने ठेचत काही अंतर फरफटत नेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

निपाणी : येथील मुरगूड रोडवरील बाळूमामानगर परिसरात शुक्रवारी (ता. २०) शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. साकीब समीर पठाण (वय १५, रा. जुने संभाजीनगर, निपाणी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

खुनाचे नेमके कारण मात्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. याप्रकरणी निपाणी शहर पोलिस (Nipani City Police) संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. पंधरवड्याच्या अंतराने शहरातील दोघांचा खून झाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

तीन ऑक्टोबरला येथील तरुण राहुल सुभानगोळ याचा महाराष्ट्रातील किल्ले भुदरगड येथे खून झाला होता. गुरुवारी (ता. १९) सायंकाळी साकीब हा घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नव्हता. शुक्रवारी सकाळी बाळूमामानगर उद्यान परिसरातील चोपडे यांच्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात साकीबचा मृतदेह आढळून आला.

जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद, चिक्कोडीचे पोलिस उपाधिक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार, पोलिस उपनिरीक्षक उमादेवी गौडा व शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. साकीबचे आई, वडील, भाऊ, नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला. बेळगाव येथील ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते.

गुरुवारी (ता. १९) रात्री उशिरा साकीबचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचे कुटुंबीय येथील जुने संभाजीनगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. वडील एमआयडीसीत कामावर असून आई गृहिणी आहे. साकीब आठवीत शिकत होता. त्याला दगडाने ठेचत काही अंतर फरफटत नेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

महात्मा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आई सिमरन हिने फिर्याद दिली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद म्हणाले, जुने संभाजीनगरमधील साकीब या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसते. याप्रकरणी संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी चालविला आहे.

पाच संशयित ताब्यात?

सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर हे शहर पोलिस ठाण्यात थांबून होते. त्यांनी घटनेच्या तपासासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न चालविला आहे. प्राथमिक टप्प्यात पाच संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी चालवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT