Schools can be started by considering these seven options 
कोल्हापूर

'या' सात पर्यायांचा विचार केल्यास सुरू होऊ शकतात शाळा 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनाचे संकट लवकर दूर न झाल्यास शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास अधिक विलंब होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने सात पर्यांयाचा विचार सुरु केला आहे. राज्यातील पहिली ते दहावीपर्यतच्या एक कोटी नऊ लाख विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी एका वर्गात फक्‍त 50 टक्‍के विद्यार्थी बसविण्यासह सम विषम वेळेत शाळा भरविण्याचा विचार सुरु करण्यात आला आहे. 


दरवर्षी मे अखेरीस शैक्षणिक वर्षास सुरुवात होते. परंतु यावेळी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास दोन महिन्यांचा विलंब होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शाळा सुरु झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध पर्यांयाचा विचार सुरु केला आहे. राज्यातील 65 लाख विद्यार्थी सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आहेत तर उर्वरीत विद्यार्थी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

राज्यातील सर्रास शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट वेळेत दूर झाले नाही तर पुढे कोणता निर्णय घ्यावा यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पर्याय सुचविण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब होऊ नये यासाठी शैक्षणिक तज्ञांशी चर्चा करण्यात आली आहे. मात्र निवडण्यात आलेल्या पर्यांयाचा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे लाभ होईल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कारण अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची संख्या कमी आहे तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी सामाजिक अंतर कसे ठेवणार हा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे शाळा सुरु करताना शिक्षण खात्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे असे मत व्यक्‍त होत आहे. 


शाळा सुरु करण्यासाठी सुचविण्यात आलेले पर्याय 

1. शाळेत येताना मास्क वापरणे, वर्गात सामाजिक अंतर राखणे 

2. सम विषम प्रमाणे शाळा भरविने 

3. शाळांना सलग सुट्टी न देणे

4. अभ्यासक्रम कमी करणे 

5. वर्गात 50 टक्‍के विद्यार्थी बसविणे 

6. परीक्षा आणि मुल्यमापनाचा वेळ कमी करणे 

7. पाठ्‌यपुस्तकात बदल करुन पुस्तक प्रभावी बनविणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT