Schools colleges closed at kolhapur district 
कोल्हापूर

शाळा, कॉलेज बंद... जोतिबा, अंबाबाईच्या दर्शनाला जाणे भाविकांनी टाळावे....

Schools colleges closed at kolhapur district

कोल्हापूर - कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयेही  आज पासुन ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ज्या शाळांमध्ये एखादा इयत्तेची परीक्षा सुरू असेल किंवा घेतली जाणार असेल, तर केवळ त्याच इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेता येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. जोतिबा, अंबाबाईच्या भाविकांनी दर्शनाला जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.  

श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तरीही, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून परदेशातून येणारे नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी स्वत:हून १४ दिवस घरामध्ये विलगीकरण केले पाहिजे. जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी अलगीकरण, तसेच विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत नियोजन करावे. तेथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर तेथे देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबतही नियोजन करावे. जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडूनही त्यांनी माहिती घेतली. जिल्ह्यामध्ये इंधन, गॅस, तसेच पुरेशा अन्न धान्याचा साठा करून ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. या वेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, 
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी.केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होत

परदेशातून आलेल नागरिक व तपासणी : 

  •  एकूण आलेले परदेश नागरिक - ११४
  • इतर ठिकाणाहून आलेले नागरिक - ०४
  • विलगीकरण कक्षामध्ये दाखल - ०३
  •  तपासणी करिता पाठविण्यात आलेले नमुने - ०६
  •  निगेटीव्ह - ०२
  •  रिजेक्‍टेड - ०२
  •  तपासणी पाठविलेले अप्राप्त अहवाल - ०१
  •  घरी विलगीकरण केलेले प्रवासी - ११८
  • त्यापैकी पाठपुरावा करुन १४ दिवस पूर्ण प्रवासी - २४
  • देखरेखीखालील असणारे प्रवासी - ९४
  •  विलगीकरणासाठी शासकीय रुग्णालयातील बेड - ३८
  •  विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयातील बेड - ६१
  • प्रसिध्दी करिता हस्तपत्रिका वाटप - १,७५,०००
  • स्टिकर्स पोस्टर्स - ८६००
  • होर्डिग - ५०

 कोरोना तपासणी संपर्क

  • डॉ. अजय केणी, ॲस्टर आधार हॉस्पिटल ९२२५०६८५०४
  • डॉ. वैशाली गायकवाड, डी. वाय. पाटील हॉस्पिटल ९८२२३७९०६९
  • डॉ. सतीश पुराणिक, अथायु हॉस्पिटल ९८२००५७८१८
  • डॉ. प्रकाश दीक्षित, डायमंड हॉस्पिटल ९८५०४४८६८०
  • डॉ. अशोक खटावकर, ॲपल हॉस्पिटल ९४२०७७८५३५

परदेशातून आलेल्यांनी तपासणी करावी 

परदेशाहून येणाऱ्या नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी स्वत:ची माहिती प्रशासनाला द्यावी. त्याचबरोबर स्वत:चे स्क्रीनिंग करून घ्यावे, आपली माहिती लपवू नये, त्यामुळे सर्वप्रथम स्वत:च्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी घरीच १४ दिवस विलगीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला निवडणूक आयोगाचा दणका, प्रचारगीत नाकारलं; एका शब्दावर आक्षेप

Latest Marathi News Live Update : संभाजीनगर : प्रभाग १६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न

Viral Video : माणुसकी आजही जिवंत आहे ! व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचंही हृदय भरुन येईल

Education System: भारतात सर्व शाळांमध्ये ऑस्ट्रेलिया पॅटर्न लागू होणार का? जाणून घ्या काय आहे हा पॅटर्न

‘कॉमन सेन्स नाही का?’सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री डेजी शाहच्या शेजारच्या बिल्डिंगला आग, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT