kolhapur Zilla Parishad general meeting, a scuffle broke out between president Bajrang Patil and member Rahul Awade 
कोल्हापूर

व्हिडीओ : अध्यक्ष म्हणाले 'तुझ्या पप्पाला 'या' निर्णयाबाबत विचार'... अन् सुरु झाली जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत खडाजंगी...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अध्यक्ष बजरंग पाटील व सदस्य राहुल आवाडे यांच्यात खडाजंगी झाली. ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोगा चा निधी परत पाठवण्यावरून हा प्रकार घडला. पाटील यांनी आवाडे यांना 'तुझ्या पप्पाला या निर्णयाबाबत विचार', असे म्हणाल्या मुळे हा वाद झाला.

ग्रामपंचायतचा निधी शासनाला देणार नाही अशी भूमिका जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षांनी घेतली. सदस्य राहुल आवाडे,विजय भोके, राजवर्धन निंबाळकर शिवाजी मोरे, शंकर पाटील यांनी या निर्णयास विरोध केला.यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी याबाबत जी.आर.असल्याचे सांगितले. यावर शासन निर्णय व परिपत्रक,यातील फरक समजून घ्या,असे आवाडे यांनी सुनावले.

आवाडे व सतीश पाटील यांच्यात खडाजंगी सुरू असतानाच यात अध्यक्ष बजरंग पाटील यांनी यात उडी घेतली. अध्यक्ष पाटील यांनी आवाडे यांना एकेरी बोलवत 'तुझ्या पप्पाला विचार,' असे विधान केले. यामुळे संतापलेल्या आवाडे यांनी अध्यक्ष पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. माझे वडील हे आमदार आहेत. त्यांच्याविषयी अनुद्गर खपवून घेणार नाही. मी माझ्या वडिलांना विचारून आलो आहे. तुम्हाला यावर बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगतच श्री पाटील यांना धारेवर धरले. यावेळी सताधरी व विरोधी सदस्यांनी आपापल्या सदस्यांची बाजू घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sankalp Kalkotwar : शिक्षक वडिलांनी दिलं पंखात बळ, आता नागपूरच्या मैदानात चमकतोय अहेरीचा खेळाडू

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT