Second list of eligible loan waiver farmers in Kolhapur district released  
कोल्हापूर

कर्जमाफीची दुसरी यादी शुक्रवारी...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यातील निकषपात्र कर्जमाफी शेतकऱ्यांची दुसरी यादी २८ तारखेला प्रसिद्ध केली जाईल आणि १५ एप्रिलला कर्जमाफी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य सरकारचे आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले दोन लाख रुपयेपर्यंतच्या कर्जमाफी योजनेतर्गंत लाभार्थांच्या नावाची यादी जाहीर, पडताळणी आणि कर्जमाफीचे पत्र शेतकऱ्यांना देण्याचा प्रारंभ जिल्हाधिकारी देसाई व संस्थाध्यक्ष संपतराव पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील ११६ निकषपात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली. आसुर्लेतील भैरवनाथ सेवा संस्थेत रेखा कुंडलिक दुबुले, बाबासो बापू जाधव या शेतकऱ्यांना जिल्ह्यात कर्जमाफीचे पत्र देण्याचा बहुमान मिळाला.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘‘बॅंक आणि सेवा संस्थांनी निकषपात्र कर्जदारांची सर्व माहिती पोर्टलमध्ये समाविष्ट केली आहे. त्यावरती आधार नंबर टाकल्यांनतर पोर्टलवर येणारी माहिती मान्य की अमान्य याची प्रत्यक्षदर्शनी पडताळणी केली जाणार आहे. अमान्य असेल तर ती माहिती थेट जिल्हा तक्रार निवारण यांच्याकडे जाऊन त्याची फेरतपासणी करून लाभार्थ्याला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.’’ जिल्हा उपनिबंधक संस्था अमर शिंदे, पन्हाळा उपविभागीय अधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने, पन्हाळा सहनिबंधक शिरीष तळेकरी, जिल्हा बॅकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), सरपंच भगवानराव पाटील, संतोष धुमाळ, गणपती चेचर, दाजी पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, जीवन शिंदे, पवन पाटील, विशाल पाटील आदींसह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT