कोल्हापूर

आजऱ्यात सीड बॅंकेचा प्रयोग; महिला करणार 80 बियाण्यांचे संवर्धन

सीड बॅंकेचा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

रणजित कालेकर

आजरा : आजरा घनसाळ, (aajra ghansal) काळा जिरगा या सुवासिक जातींबरोबरच तालुक्यात विविध प्रकारच्या देशी बियाण्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न कृषी विभाग, शेतकरी मंडळ यांसह विविध घटकांकडून होत आहे. यामध्ये यंदा महिलांनीही सहभाग घेतला असून साळगाव, दाभिल व देवकांडगाव या गावांतील महिला बचतगट ग्रामसंघ सक्रिय झाले आहेत. या गावांत ८० प्रकारच्या स्थानिक प्रजातींचे संवर्धन केले जाणार आहे. वन विभागाच्या वन अमृत योजनेअंतर्गत (van amrut yojana) हा प्रयोग राबविला जात आहे. सीड बॅंकेचा (seed bank) तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

सुधारित, संकरित व संशोधित बियाण्यांमुळे देशी वाण लोप पावत चालले आहे. देशी वाण वाचवावयाची असतील तर सीड बॅंक (बियाण्यांची बॅंक) उभारणे गरजेचे आहे. आजरा तालुक्यात (aajra tehsil) देशी वाणांमध्ये भाताच्या विविध जाती अस्तित्वात होत्या. कालौघात या जाती नष्ट पावत आहेत. या जातींचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी या दहा-बारा वर्षांत प्रशासन पातळीवर पावले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांना अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे.

आजरा घनसाळ व काळा जिरगा याबाबत कृषी विभाग व आजरा शेतकरी मंडळाने पुढाकार घेतला आहे. इतर बियाण्यांबाबत अजूनही विशेष प्रयत्न झालेले नाहीत. यंदा मात्र साळगाव, दाभिल व देवकांडगावमधील ९० बचतगट ग्रामसंघ देशी वाण संवर्धनासाठी पुढे आले आहेत. वन विभागाच्या वन अमृत योजनेमार्फत ८० वाणांची लागवड करून त्याचे संवर्धन केले जाणार आहे. यासाठी बचत गटांना ८० वाणांचे २२० किलो बियाणे पुरवले आहे. उपजीव तज्ज्ञ योगेश फोंडे, प्रभाग समन्वयक शांताराम कांबळे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पती तज्ज्ञ डॉ. एन. बी. गायकवाड यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे.

सीड बॅंकेत या बियाण्यांचा समावेश

वरंगळ, रेड मुसळी, सोनफळ, सोरटी, तांबडी कर्जत, टाक भात, जोंधळा जिरगा, कोथमिरसाळ, पंचगंगा, आंबेमोहोर, काळा जिरगा, मांजरवेल, खप मोठ, लक्ष्मी, सव्वाशीन, पनवेल, तांबड मासाड, तुळशई भात, एककाडी, भोगावती, दोडगा, जया, सगुणा, कोरजाई, मनिला, गजरावती, इटाण, कावेरी, अकीलसाळ, बासमती गावठी, नाचणी भात, भडस, मोठीरत्ना, सोमशिळा, चंपाकळी, वांडर भात, काळ भात, कुडतरी, जवाऱ्या भात, डांगी, अखिलसाळ, काळीकुडई, तांबडा जोगा, भोवड्या, वालय, करंगूट, वैशाखी, कोळपी, चिमणसाळ, गारीकोळपी, सुगंधी भोग, एवेरथ, निरुल्या, मकम, तरुण भोग, दांडेली, कोचरी, कसबाई, मसूरा, जिरेसाळ, साळवा, तांबडीमाळ, कालेखी, जिरेसाळमोठ, भाळूसत्ता, तुळशी मंजुळा, जिरेल, हेजवी, वेगमभोग, लाल सुकडू, दोडीहाळ, काळी डांगर, देशीभात, हिरानखी, मणीभोग, कुनी, वस्कमाला, सोनहिरा, सिद्धी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

LinkedIn Workforce Survey: एआयमुळे बदलतंय मुंबईचं बिझनेस लँडस्केप, लिंक्डइनच्या सर्व्हेत समोर आले धक्कादायक आकडे

SCROLL FOR NEXT