senior citizen died in road accident kolhapur 
कोल्हापूर

अन् मुलगीकडे कालच राहण्यासाठी आलेले तिचे बाबाच अपघातात ठार झाल्याचे झाले स्पष्ट...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - एसएससी बोर्ड आयसोलेशन हॉस्पिटल रिंग रोडवर सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रकने धडक दिल्या चा आवाज झाला. परिसरातील महिला नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. तेव्हा एका ट्रकने एका ज्येष्ठ नागरिकास ठोकर दिल्याचे दिसून आले. यावेळी मनीषा नगर मधील महिलेने रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून आक्रोश केला. तेव्हा मुलगीकडे कालच राहण्यासाठी आलेले तिचे बाबाच अपघातात ठार झाल्याचे स्पष्ट झाले.
 भीमराव धोंडीराम सातारकर वय.58 रा.शाहूनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

एसएससी बोर्ड आयसोलेशन हॉस्पिटल रिंग रोड वरील छत्रपती चौकात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. कालच मुलीकडे राहण्यासाठी आलेले सातारकर हे रिंग रोड वरील बस थांब्यावर बसले होते. एसएससी बोर्ड कडून राधानगरीकडे जाणारा ट्रक छत्रपती चौकातील गतिरोधका जवळ आला. याचवेळी भिमराव हे रस्ता ओलांडत होते. येथे ट्रक ने ठोकर दिल्यामुळे ते जागीच ठार झाले. परिसरातील नागरिकांनी महिलांनी गर्दी केली. तेव्हा मनीषा नगर मधील मुली कडे ते कालच राहण्यासाठी आल्याची माहिती पुढे आली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह सीपीआरमध्ये नेण्यात आला आहे. मृत भिमराव सातारकर यांच्यामागे दोन मुली एक मुलगा जावई असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT