Senior Literary Prof. Raja Shirguppe Passed Away in Kolhapur esakal
कोल्हापूर

Raja Shirguppe : ज्‍येष्‍ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं कोल्हापुरात निधन; वयाच्या 64 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास

राजाभाऊंनी (Raja Shirguppe) साहित्यिक क्षेत्राला मोठं योगदान दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या निपाणीतील (Nipani) कामगार चळवळीतून ते समाजकारणात सक्रिय झाले.

कोल्हापूर : ज्येष्‍ठ साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे (वय ६४) यांचं आज (मंगळवार) कोल्हापुरात नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनामुळं हळहळ व्यक्त होत आहे.

राजाभाऊंनी (Raja Shirguppe) साहित्यिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. मूळचे निपाणीचे असलेले राजाभाऊ शिरगुप्पे हे गेली अनेक वर्षे आजऱ्यात वास्तव्यास होते. दोन महिन्यापासून त्यांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजाभाऊंनी कथा, कविता, नाटक, चित्रपट, पथनाट्य, समीक्षा लेखन आदी क्षेत्रांत आपली मोहर उमटवलीये. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या निपाणीच्या तंबाखू कामगार चळवळीपासून ते समाजकारणात सक्रिय झाले.

शिवाय, विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह प्रगतशील अशा विविध प्रकारच्या चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. सांगलीत झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. राजाभाऊंच्या मागे पत्नी प्रा. मीना शिरगुप्पे, चित्रकार मुलगा रोहन, मुलगी अनुजा, सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT