Separate Lingayat religion records Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

लिंगायत धर्माची नोंद स्वतंत्र करा

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : शासनातर्फे होणाऱ्या आगामी जनगणनेतील धर्माच्या स्वतंत्र कॉलममध्ये लिंगायत धर्म अशी नोंद करून घ्यावी, तशा सूचना जनगणनेच्या प्रगणकांना देण्यात याव्यात या मागणीचे निवेदन येथील प्रांत कार्यालयाला देण्यात आले. शिष्टमंडळात लिंगायत समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

प्रांत कार्यालयासमोर उपस्थित समाजासमोर लिंगायत धर्मसभेचे अध्यक्ष महेश आरभावी यांनी लिंगायत धर्माबद्दलची माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्‍वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून लिंगायत धर्माची स्थापना केली आहे. देशात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गोवा आदी राज्यात लिंगायतला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा, त्याला सांविधानिक मान्यता मिळावी व अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा यासाठी अनेक आंदोलने झाली.

याची दखल घेवून कर्नाटक शासनाने न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अभ्यास करण्याची सूचना केली. त्यानंतर लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून त्याला सांविधानिक मान्यता मिळावी, असा अहवाल केंद्र शासनाला पाठविला आहे. महाराष्ट्र शासनाकडेही तसा पाठपुरावा सुरू आहे. जडेयसिद्धेश्‍वर आश्रम बेलबाग, वीरशैव समाज, बसवेश्‍वर पुतळा प्रतिष्ठान, राष्ट्रीय बसवदल, युवक बसवदल, पाटील समाज, तेली समाज, जंगम समाज, दैव समाज, माळी समाज, हडपद आप्पण्णा समाज सहभागी झाले होते.

या वेळी लिंगायत धर्मसभेचे अध्यक्ष महेश आरभावी, राजू दड्डी, राजू तारळे, बी. बी. पाटील, संतोष चिक्कोडे, महेश तुरबतमठ, गुरूनाथ कुरणगे, मारूती हळीज्वाळे, एम. आर. नेवडे, नगरसेवक महेश कोरी, उदय पाटील, शशिकला पाटील, महादेव मुसळे, शिवप्रसाद तेली, राजू खमलेट्टी, नागेश कागे, वैभव वाळकी, श्रीनिवास वेर्णेकर, नागेश चौगुले, राहूल पाटील, सोमगोंडा आरबोळे, आशपाक मकानदार, श्रीशैलाप्पा गाडवी, बसवराज आजरी, मल्लीकार्जुन बेल्लद, सरिता चराटी, अंजली तोटगी, विजया आजरी आदी उपस्थित होते. 

ब्रिटीश कालीन शासन दरबारात नोंद
लिंगायत धर्माची पूर्वी ब्रिटीश कालीन शासन दरबारात नोंद आढळते. परंतु स्वातंत्र्यानंतर या धर्माची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. धर्माची मान्यता काढून घेतली आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेवून येणाऱ्या जनगणनेत लिंगायतांची नोंद धर्म या कॉलममध्ये स्वतंत्र धर्म म्हणून व्हावा अशी अपेक्षा आहे. 
- महेश आरभावी, अध्यक्ष लिंगायत धर्मसभा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बनावट आयपीएसने आधीही केलेत कांड, परराज्यात नावावर गुन्हा; पत्नी आहे पोलीस अधिकारी

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Leopard Attacks: शिरूरमध्ये संतापाचा स्फोट! बिबट्यांच्या हल्ल्यांवर निष्क्रिय प्रशासनाविरोधात तहसीलदार कार्यालयाला टाळे"

Latest Marathi News Live Update : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Girish Mahaja : नाशिक-त्र्यंबक रस्ता पाडकाम वाद मिटला! गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर १३ दिवसांचे साखळी उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT