Seventh pay sanctioned to municipal employees 
कोल्हापूर

Good News ; महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी पाणीपुरवठा व प्राथमिक शिक्षण मंडळाकडील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन निश्‍चिती करण्यास राज्यशासनानेही मंजूरी दिली आहे. 1 जानेवारी 2020 पासून या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याचा फायदा महापालिकेच्या चार हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा,अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. महापालिका कर्मचारी संघानेही यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार महानगरपालिका सभागृहाची मान्यता झाली होती. या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला होता. त्यानुसार या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे.

या कामासाठी कर्मचारी संघाने शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला असून, महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी व विशेषतः राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.असे महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

SCROLL FOR NEXT