Shankar Gowda PShankar Gowda Patil's office is being set up at Sardars Maidan belgumtil's office is being set up at Sardars Maidan belgum 
कोल्हापूर

जागा शिक्षण खात्याची, निधी शंभर कोटीतला, खर्च महापालिकेचा अन कार्यालय भाजप नेत्याचे....

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - जागा शिक्षण खात्याची, क्रिडा संकुल बांधले शंभर कोटी निधीतून, कार्यालय तयार करण्यासाठी खर्च महापालिकेचा आणि ते कार्यालय वापरणार मुख्यंत्र्यांचे राजकीय सचिव. येथील सरदार्स मैदानावरील क्रिडा संकुलाची ही स्थिती सध्या क्रिडाप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सरदार्स मैदानाचा वापर केवळ क्रिडा उपक्रमांसाठी केला जावा असा ठराव 2010 साली तत्कालीन जिल्हाधिकारी जे. रविशंकर यानी केला आहे. त्यामुळे तेथे दरवर्षी होणाऱ्या विविध प्रदर्शनांवर बंदी घालण्यात आली. सरदार्स मैदान शिक्षण खात्याच्या मालकीचे आहे, त्यामुळे तेथे कोणताही क्रिडा उपक्रम घ्यावयाचा असेल तर जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी लागते. त्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून भाडे निश्‍चित करण्यात आले आहे. फिरोज सेठ बेळगाव उत्तरचे आमदार असताना त्यानी या मैदानावर क्रिडा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. 1 कोटी रूपये खर्च करून तेथे प्रेक्षक गॅलरी व दुकानगाळे बांधले. शंभर कोटी रूपये निधीतील 1 कोटी रूपये या योजनेसाठी खर्च करण्यात आले.

ते येडीयुराप्पा यांचे राजकीय सचिव...

बांधकाम पूर्ण होवून दोन वर्षांचा कालावधी लोटण्यास आला तरी तेथील संकुलातील गाळ्यांचा वापर झाला नव्हता. पण आता अचानक तेथील एका गाळ्याचे नूतनीकरण सुरू करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता तेथे शंकरगौडा पाटील यांचे कार्यालय होणार असल्याची माहिती देण्यात आली. शंकरगौडा हे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे राजकीय सचिव आहेत. त्यांच्या सूचनेवरूनच सरदार्स मैदानावरील संकुलात त्यांचे कार्यालय तयार केले जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठीचा खर्च महापालिकेकडून केला जात आहे. क्रिडा संकुलातील गाळे क्रिडा क्षेत्राशी संबंधित आस्थापनांसाठी भाडेकराराने देण्यात येणार होते. तेथे पुरूष व महिला खेळांडूनसाठी स्वतंत्र चेंजींग रूमही तयार करण्यात आले आहे. पण अचानक एका राजकीय व्यक्तीचे कार्यालय तयार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे 2010 साली जिल्हाधिकाऱ्यानी केलेल्या ठरावाला महापालिका प्रशासनाने हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे. सरदार्स मैदानाच्या सुधारणेची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती. पण त्यासाठी निधी कोणी खर्च करावयाचा याबाबतचा निर्णय झाला नव्हता. फिरोज सेठ यानी पाठपुरावा करून शंभर कोटी रूपये निधीतील एक कोटी रूपये रक्कम मंजूर केली. संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन विलंबाने झाले. तेथील गाळ्यांचे वितरण मात्र लवकर झाले नाही. आता अचानक तेथे कार्यालय सुरू करण्यात येत आहे.

लक्ष्मी निपाणीकर. अधिक्षक अभियंत्या. महापालिका- सरदार्स मैदानातील संकुलातील गाळ्याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तेथे शंकरगौडा पाटील यांचे कार्यालय तयार करण्यात येत आहे.

Shankar Gowda Patil's office is being set up at Sardars Maidan belgum kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT