shaumika mahadik credited on satej patil on the topic of elecction of gokul in kolhapur 
कोल्हापूर

'पालकमंत्र्यांची रात्रीची झोप उडालीय'; शौमिका महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील बंद पडलेले दूध संघ सुरु करण्यासाठी प्रयत्न का? केले नाहीत. त्यांना गोकुळ दूध संघच का हवा आहे? असा सवाल करत दहा वर्षांपूर्वी पालकमंत्री अप्पांसोबतच (महादेवराव महाडिक) काम करत होते. आता दहा वर्षांचा खंड पडला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना माहिती नाही की अप्पांची जरी दुपारीची झोप गेली असली तरी पालकमंत्र्यांची रात्रीची झोप उडाली आहे, त्यांची झोप होईपर्यंत अप्पा जिल्हा पिंजून काढतात, असा टोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची स्नुषा शौमिका महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. 

गोकुळ निवडणुकीसाठी सौ. महाडिक यांनी आज अर्ज दाखल केला. 'गोकुळ'च्या मैदानात उतरणाऱ्या सौ. महाडिक ह्या महाडिक कुटुंबातील पहिल्या सदस्या आहेत. गोकुळ निवडणुकीसाठी तीन दिवसांत इच्छुक उमेदवारांची झुंबड उसळली आहे. नेत्यांचे वारसदार तसेच कार्यकर्तेही अर्ज भरत आहेत. दरम्यान, आज शौमिका यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून गोकुळ निवडणुकीत उडी घेतली आहे. करवीर प्रांताधिकारी कार्यालयात आज त्यांनी अर्ज दाखल केला. 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू आघाडीने मोट बांधल्यामुळे 'गोकुळ'मधील सत्तारूढमधील नेत्यांना दुपारची झोप मोडून लोकांची भेट घ्यावी लागत असल्याची टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना सौ. महाडिक यांनी पालकमंत्र्यांना टोला लगावला. 

त्या म्हणाल्या, 'गोकुळच्या सत्तेचे स्वप्न पालकमंत्र्यांना अस्वस्थ करत आहे. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ज्येष्ठ संचालक अरुण नरके गेली 40 वर्षे 'गोकुळ'चा कारभार करत आहेत. त्यांच्या कारभारामुळे सध्या गोकुळ संघ चांगल्या पद्धतीने सुरू आहे; पण महाडिक असतील किंवा पी. एन. पाटील यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना या रिंगणात कधी उतरवले नव्हते. विरोधक काहीही म्हणत असले तरी आपला विश्‍वास दूध उत्पादक आणि संस्था प्रतिनिधीवर आहे, तो योग्य न्याय या निवडणुकीत करतील. निवडणूक जवळ येईल तसे यातील पत्ते उघडे होत जातील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT