shiv bhojan thali started in kolhapur 
कोल्हापूर

आता कोल्हापुरात या ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सुभाष रोड येथील रुद्राक्षी स्वयंमहिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंट येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ झाला. 

यावेली पालकमंत्री पाटील म्हणाले, ""केवळ दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना शासनाने आणली आहे. शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा संपूर्ण राज्यात प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 50 ठिकाणी प्रारंभ होत आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागातही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू जनतेला अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. स्वस्त दरात, स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना निश्‍चितपणे उपयुक्त होईल.'' 

जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे आदीसह बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज येथे महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर, ताराबाई रोड येथील श्री महालक्ष्मी भक्तमंडळ येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते तसेच साईक्‍स एक्‍स्टेंशनमधील हॉटेल साईराज येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेस प्रारंभ झाला. या ठिकाणी अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे उपस्थित होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT