Shiv Sena and Manuski Foundation locked the office of Bharat Nirman by shouting slogans 
कोल्हापूर

कोल्हापुरात भारत निर्माणच्या कार्यालयाला टाळे ; पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार

सकाळ वृत्तसेवा

तारदाळ (कोल्हापूर) : शिवसेना व माणूसकी फाऊंडेशन च्या वतीने घोषणाबाजी करत भारत निर्माणच्या कार्यालयाला टाळे ठोकले . भारत निर्माण च्या अपूर्ण कामकाजाबद्दल  तारदाळ व खोतवाडी  ग्रामपंचायतीचा जाहिर निषेध करीत या योजनेचे अध्यक्ष सचिव व समितीवर आरोप करीत भारत निर्माण योजनेच्या संपूर्ण कामाचा अहवाल सादर करावा अन्यथा येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .


 गेली अठरा महिने भारत निर्माण योजनेचे ऑडिटचे काम अपूर्ण असल्याने शिवसेना व माणूसकी फाउंडेशनने याबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता परंतु अद्यापही ऑडिट अपूर्ण असल्याने तेवीस सप्टेंबर रोजी शिवसेनेने व माणूसकी फाऊंडेशनने अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात पाच ऑक्टोंबर रोजी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता  . त्या अनुषंगाने शिवाजी चौकात माणूसकी फाउंडेशन व शिवसेने च्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करत भारत निर्माण व ग्रामपंचायतीवर हल्लाबोल करीत भारत निर्माणच्या कार्यलयाला टाळे ठोकले .

त्यावेळी गोंधळ माजल्याने भारत निर्माणचे पदाधिकारी व आंदोलन कर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याने व अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला . आंदोलन कर्त्यांनी आठ दिवस अगोदर निवेदन देवूनही दोन्ही ग्रामपंचायत व भारत निर्माणच्या पदाधिकाऱ्यांना ठोस मांडणी करता न आल्याने आंदोलक आणखी आक्रमक झाले त्यावेळी जमावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या वर शिविगाळ करीत वैयक्तीक हवेदावे काढण्याचा प्रयत्न केला .

दरम्यान शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महादेव गौड यांना ग्रामपंचायत व भारत निर्माण यांनी लेखी पत्राव्दारे पंधरा ऑक्टोंबर ला भारत निर्माण व ग्रामपंचायतची मिटिंग घेवून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळे ठोक आंदोलन मागे घेण्यात आले .माणूसकी फांऊंडेशनने तारदाळ व खोतवाडी ग्रामपंचायतीला टाळे ठोक करण्याचा इशारा दिला होता परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही ग्रामपंचायतीला टाळे घालता आले नाही .


भारत निर्माण योजनेच्या कामाकाजाबाबत व ऑडिट बाबत गेल्या वर्षभरात वारंवार तकारी वाढल्याने याबाबत तारदाळ खोतवाडी मधील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून कायमस्वरूपी कारभार पारदर्शक रहावा यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा गावातील हि चांगली योजना मोडकळीस जाईल अशी चर्चा ग्रामस्थांतून होताना दिसून येते .


संपादन - अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT