Shiv Sena Melava Kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur : 'बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली ही दीवार आहे, छोट्या-मोठ्या धक्क्याने ती कोसळणार नाही'

ज्यांनी धोका दिला आहे, त्यांचा बदला घ्यायचा आहे, यासाठी पक्ष तळागाळात पोहोचवा.

सकाळ डिजिटल टीम

पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर न मांडता ते ‘मातोश्री’च्या दारात सोडवले गेले पाहिजेत. लोकसभेच्या २८८ जागा लढवण्याची तयारी होण्यासारखी बांधणी करा.

कोल्हापूर : ‘ज्यांनी धोका दिला आहे, त्यांचा बदला घ्यायचा आहे, यासाठी पक्ष तळागाळात पोहोचवा. पक्ष बांधणीचे काम मजबूत करा,’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर (Arun Dudhwadkar) यांनी येथे केले.

पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात मशाल पेटवून लोकसभेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार केला.

दरम्यान, मेळाव्यात सच्च्‍या आणि प्रामाणिक शिवसैनिकालाच उमेदवारी द्या, उसना उमेदवार नको, अशी ही मागणी सर्वांनीच भाषणात केली. याचवेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी थेट कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली.

दुधवडकर म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली ही ‘दीवार’ आहे. छोट्या-मोठ्या धक्क्याने ती कोसळणार नाही. लोकसभेसाठी उमेदवारी मागताना आपल्या पायाखाली किती थर मजबूत आहेत, हेसुद्धा पाहायला पाहिजे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी पोहोचले पाहिजे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर न मांडता ते ‘मातोश्री’च्या दारात सोडवले गेले पाहिजेत. लोकसभेच्या २८८ जागा लढवण्याची तयारी होण्यासारखी बांधणी करा.’

विजय देवणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी कधी खुर्चीसाठी राजकारण केले नाही. ज्यावेळी मी लोकसभा लढविली तेव्हा आपल्याकडे एकही आमदार नव्हता. फक्त संजय पवार बरोबर होते. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता उसना उमेदवार नको. एकेकाळी सहा आमदार, दोन खासदार शिवसेनेचे होते. ते पुन्हा आणायचे आहेत. त्यासाठी लवकरच आम्ही राधानगरीपासून ‘मिशन २०२४’ हाती घेणार आहोत.’

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘मतदार संधीची वाट पाहत आहेत. स्वाभिमानाने जनतेसमोर जायचे आहे. येणारा काळ अडचणीचा आहे; पण कठीण नाही. यासाठी सच्चा शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा अहवाल मातोश्रीवर पोहोचवावा.’

माजी आमदार सत्यजित पाटील यांनी नेमका मेळावा कशासाठी आहे, हेच सांगण्यात आले नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘लोकसभेसाठी जो उमेदवार द्याल, त्याला शाहूवाडी, आंबा परिसरातून मताधिक्य देऊ.’ माजी आमदार सुजित मिणचेकर म्हणाले, ‘भाजप घराघरांत भांडणे लावत आहे. सुरुवातीला शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. भाजपची ही रणनीती मतदारांसमोर आणली पाहिजे.’

मुरलीधर जाधव म्हणाले, ‘काहीजण निवडणुकीवेळी पक्षात येऊन खासदार झाले. आता हे चालणार नाही. आता उसना उमेदवार खपवून घेणार नाही.’ यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, सांगलीचे जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, नियाज खान, विशाल देवकुळे, मंजित माने, हर्षल सुर्वे, दीप्ती कोळेकर, स्मिता सावंत, प्रकाश पाटील, सुप्रिया पाटील, अवधूत साळोखे, प्रभाकर खांडेकर, विराज पाटील, तानाजी आंग्रे, दीपाली शिंदे, दीपक गौड आदी उपस्थित होते.

shiv sena melava Kolhapur

पक्षांतर केलेल्यांचा समाचार

‘ज्यांना खुर्चीला खुर्ची लावून बसविले त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. ही शिवसेना ठाकरेंची आहे. कुठेही कमी पडणार नाही. खुर्चीला खुर्ची लावून बसणारे बाहेर पडले असले तरी समोर बसणारे मतदार आपल्याला निवडून दिलेलेच आहेत, हे विसरून चालणार नाही’, अशा शब्दांत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी शिवसेनेतून पक्षांतर केलेल्यांचा समाचार घेतला.

राजघराण्याचा आदर करावा...

शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्यावर टीका केली. त्यावर दुधवडकर यांनी राजघराणे हे राजर्षी शाहू छत्रपतींचे वंशज आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो आणि इतरांनीही आदर करावा, असे सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT