shivaji mane criticised on raju shetti kolhapur 
कोल्हापूर

आमदारकीसाठी शेट्टींनी स्वाभिमान विकला ; 'या' संघटनेनं केला आरोप....

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ज्या बारामतीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी चळवळीचा इतिहास रचला त्याच बारामतीत आमदारकीसाठी त्यांना शरण जावे लागले. शेट्टी यांनी आमदारकीसाठी स्वाभिमान विकला असून सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेची त्यांनी चेष्टा केला असल्याचा घणाघाती आरोप जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी प्रसिद्धी पत्रकात केला.

आजपर्यंत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला घामाचा दाम मिळावा यासाठी गावागावात संघर्ष केला. अनेक ठिकाणी साखर सम्राटांच्या गुंडांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली. खोटे गुन्हे दाखल केले. हे कार्यकर्ते आजही कोर्टाच्या चकरा मारत आहेत.
ज्या राष्ट्रवादी बरोबर आज पर्यंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला त्याच पक्षाच्या नेत्यांच्या दारात पदासाठी राजू शेट्टीं सारख्या माणसाला जावं लागणं ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची शोकांतिका असल्याची टीकाही पत्रकात केली आहे.

आमदारकी घ्यायची होती तर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विचार करता आला असता. स्वाभिमानीकडे डॉ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे अशी बिनीचे शिलेदार होते. चळवळ वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग झाला असता, परंतु केवळ सत्ता आणि सत्ता याच्याच मागे लागलेल्या शेट्टी यांना कार्यकर्त्याचा कोणतेच सोयरसुतक नाही, यामुळेच त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा घात करून गोविंद बागेत आमदारकी स्वीकारली आहे.

सर्वसामान्य शेतकरी व चळवळीसाठी मार खाल्लेला कार्यकर्ता हे कधीही विसरणार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला जाऊन शेट्टींनी चळवळ मोडण्याचे पाप केले आहे.भविष्यात त्यांना शेतकरी आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. असेही पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकावर जय शिवरायचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, तालुकाध्यक्ष गब्बर पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष बंडा पाटील, मार्गदर्शक सदाशिव कुलकर्णी,कृष्णकांत रेंगडे, बाजीराव पाटील,दत्ता शिंदे,भाऊ पाटील, रामदास वड्ड, उत्तम पाटील, संतोष पाटील, दत्ता पाटील,मल्हारी भांडवले यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT