shivaji university
shivaji university  sakal
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा ५८ वा दीक्षान्त सोहळा होणार ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा

राजर्षी शाहू सभागृहात सकाळी अकरा वाजता त्यास सुरवात होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचा (Shivaji University) ५८ वा दीक्षान्त सोहळा (Dikshant Sohala) शनिवारी (ता. ५) ऑनलाईन (Online) होत असून, यंदा ३२ हजार ५२० विद्यार्थिनी पदवी प्रमाणपत्रे (Certificate) स्वीकारणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. दिनकर साळुंखे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे.

राजर्षी शाहू सभागृहात सकाळी अकरा वाजता त्यास सुरवात होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यंदाचे राष्ट्रपती सुवर्णपदक वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील ऐश्वर्या आकाराम मोरे, तर कुलपती सुवर्णपदक दानोळी (ता. शिरोळ) येथील स्वाती गुंडू पाटील हिला जाहीर झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. शिर्के म्हणाले, "यंदा ३२ हजार ५२० विद्यार्थिनीं, तर २९ हजार ८४० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे. सर्व पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिके पोस्टाद्वारे पाठवली जाणार आहेत. महावितरण स्तरावर होणारा पदवी वितरण कार्यक्रम यंदा होणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांचे शुल्क पेमेंट गेटवेद्वारे, तर दीक्षान्त अर्ज फक्त ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यात आले आहेत. पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिक प्राप्त स्नातकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 58 convocation अंतर्गत प्रसिद्ध केली जाणार आहे." पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. गजानन पळसे उपस्थित होते.

यंदाची पदवी प्रमाण पत्र विद्यार्थी संख्या अशी :

* शाखा * विद्यार्थिनी * विद्यार्थी

- बी. कॉम. - ७८३३ - ५४००

- बी. एस्सी. - ७०३१ - ६८७२

- बी. ए. - ४५०२ - ४६१७

- एम. एस्सी. - १६७० - ७५१

- एम. काॅम. - ११८४ - ७५६

- बी. एड्. - ६९७ - २०२

- एम. ए. - ६६३ - २७७

दीक्षान्त सोहळ्यात प्रत्यक्ष कोणतेही पारितोषिक अथवा पदवी प्रदान करण्यात येणार नाही. त्यासंदर्भात स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे निमंत्रितांनीही कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित न राहता विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ (https://www.youtube.com/c/ShivVarta) या युट्यूब वाहिनीवरच सकाळी १०.४५ वाजता ऑनलाईन उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE: काही वेळातच सुरू होणार चौथ्या टप्प्यातील मतदान; केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

SCROLL FOR NEXT