कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या डायरी व कॅलेंडरमध्ये चुका राहिल्याने सदस्यांनी अधिसभेत प्रशासनाला आज धारेवर धरले. डायरीवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा न छापणाऱ्या डायरी समितीला शिवरायांची ऍलर्जी आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत डायरीत चुका करणाऱ्यांवर खर्च वसुलीसह कारवाई करावी, असा पवित्रा त्यांनी घेतला. कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी त्याबाबतचा खुलासा मागवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गतवेळच्या आधीच सभेतील विषयासंबंधीच्या चर्चा, सभा त्यागाचा उल्लेख का केला नाही?, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.
डायरी, कॅलेंडरमध्ये शिवरायांची प्रतिमा नसल्याचा निषेध
प्रा. प्रताप पाटील यांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत अधिकारी व सदस्यांच्या मुदती संपतील. मात्र ठोस निर्णय होणार नसतील तर विद्यापीठाची बदनामी होत राहील. स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर सभात्यागाचा उल्लेख इतिवृत्तात का नाही?, अशी विचारणा केली. प्रकाश शंकर कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या डायरेक्ट झाल्याचे निदर्शनास आणले डायरीत आयुक्तांचे नाव चुकीचे छापले छापण्याची सांगताच श्रीनिवास गायकवाड यांनी समितीला शिवरायांची ऍलर्जी आहे का? असा प्रश्न केला खर्च कोणाच्या कोणाकडून वसूल करायचा? अशी विचारणा करतात केल्यानंतर भैया माने यांनी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करत निषेध व्यक्त केला.
प्रा.मधुकर पाटील यांनी डायरी करणाऱ्या संबंधितांचे निलंबन करावे अथवा त्यांनी सभागृहात येऊन दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली. डायरीवर शिवरायांची प्रतिमा न छापणे म्हणजे शिवरायांच्या विचारांचा अपमान असून, त्याचे आम्ही समर्थन करतो असा मेसेज समाजात जाईल, असे स्पष्ट केले. तसेच चौकशी समित्यांचे काय होते, याचा खुलासा करण्याची मागणी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.
प्रशासनाच्या ढिलाईचा आरोप
डायरी व कॅलेंडरमधील चुकांवरील कारवाईबाबत प्रा. प्रताप पाटील यांनी प्रशासन ढिलाई करत असल्याचा आरोप केला. प्रशासन विद्यापीठाची वाट लावणार का? सुधारणा करणार की नाही? अशी विचारणा त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.