Shivaji university convocation event in Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

'या' विदयापीठाच्या दीक्षांत समारंभात असणार खादीचा ड्रेसकोड..

अर्चना बनगे

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या 56वा दीक्षांत समारंभ सोहळ्यात यंदा खादी कपड्याचा वापर होणार असून यावर्षी सोहळ्याच्या मिरवणुकीत खादी ड्रेसकोड असणार आहे. त्यात खादी सलवार-कुर्ता आणि मोरपंखी रंगाचे जॅकेट असा पोशाख असेल.
 
पदवीदान समारंभात अनेकांना आकर्षण असते ते ड्रेस कोडचे. विद्यापिठाच्या आवारात ड्रेस कोड आणि पदवी प्रमाणपत्र घेऊन आयुष्यातील अविस्मरणीय क्षण अनेकजण छायाचित्राच्या माध्यमातून टिपतात. अनेक वर्षे शिवाजी विद्यापीठाचा ड्रेसकोड ठरलेला आहे. यावर्षी मात्र त्यात बदल होणार आहे.

खादी वापराचे आवाहन

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विद्यापीठाने पदवीदान सोहळ्यात खादी कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना यूजीसीने दिली आहे. या सूचनेचे पालन करत शिवाजी विद्यापीठाने या दीक्षांत समारंभात अकॅडमिक आणि मॅनेजमेंट समितीने खादी सलवार कुर्ता आणि मोरपंखी रंगाच्या जाकेट असा ड्रेस कोड केला आहे. शिवाय पदवीदान सोहळ्यात पदवी प्रमाणपत्र पारितोषिके स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यानी खादी कापड वापरावे, यासाठी आवाहन केले आहे. 

खादी कापड का वापरावे..

खादी कापड हे केवळ सांस्कृतिकदृष्टीने नाही तर सर्वच ऋतूंत हे शारीरिकदृष्ट्या अनुकूल आहे. शिवाय महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात खादीचा उपयोग इंग्रजांविरुद्ध शस्त्रासारखा केला होता. यामुळे या कपड्यांना राष्ट्रभिमानाचे ऐतिहासिक मूल्य आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या पदवीप्रदान कार्यक्रमात खादीचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 


यंदा वेगळा स्टोल 
यंदाच्या मानववस्त्राचा रंग पांढरा नसून केसरी असणार आहे. हा स्टोल 2 मीटर लांब 7 इंच रुंद आणि 1,1 इंच किनारपट्टीचा असणार आहे. तसेच त्यावर विद्यापीठाचे दोन लोगो व विद्यापीठाचे नाव अशा पद्धतीच्या हा स्टोल असणार आहे. 

 यावर्षीच्या  दीक्षांत सोहळ्यात बदल
विद्यापीठ आयोगाच्या सूचनेनुसार दीक्षांत सोहळ्यात आम्ही प्रथमच असा बदल करणार आहोत. यातून यावर्षी नक्कीच वेगळी झलक या कार्यक्रमात पाहावयास मिळेल. 
- गजानन पळसे , प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT