Sanjay Mandlik Sakal
कोल्हापूर

खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यानंतर कोल्हापूरातील शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला आहे. शिवसैनिक संतप्त झाले असून गद्दार म्हणत त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.

खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेतून शिंदे गटात उडी मारल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. पहिल्यांदा धैर्यशील माने यांच्या घरावर आणि नंतर संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला आहे. "ते गद्दार झाले आहेत, त्यांनी आता राजीनामा द्यावा आणि नंतर निवडून येऊन दाखवावं." असं मत शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

"आम्ही त्यांना प्रश्न करणार आहोत की, तुम्ही नेमकी गद्दारी का केली? मंडलिक हे क्षीरसागर यांना बेंटेक्स असं म्हणाले होते. राहिलं ते सोनं आणि गेले ते बेंटेक्स असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण ते आता त्यांनाच लागू होत आहे." असं शिवसैनिक म्हणाले आहेत. आम्ही निष्ठावंत असून गद्दारांच्या विरोधात मोर्चा काढत असल्यातं त्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, धैर्यशील मानेंनी गद्दारी आणि बंडखोरी का केली? याबाबत त्यांना जाब विचारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी यापूर्वी दिला होता. त्यानंतर आता मंडलिक यांच्या विरोधातही शिवसैनिकांकडून निदर्शने केले जात आहेत.

"आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळं आमच्यासमोर तुम्ही केंद्रीय दल आणा किंवा इतर कोणतंही दल आणा, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तो कुणाला घाबरत नाही. आम्ही काही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही आणि शिवसेना आमची आई आहे. आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर आम्ही ते उघड्याडोळ्यांनी पाहू शकत नाही. जशास तसे उत्तर देणार." असा गर्भित इशाराही जाधव यांनी गद्दारांना दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT