kolhapur political News esakal
कोल्हापूर

'मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द फिरवला म्हणणं योग्य नाही'

संभाजीराजेंचा हा व्यक्तीगत निर्णय असून छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

संभाजीराजेंचा हा व्यक्तीगत निर्णय असून छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला आहे.

कोल्हपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना व्यक्तीगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय असून छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला असून कुणीही अवमान केलेलं नाही. दरम्यान, आपण अजूनही शिवसेनेत असल्याचे सूचक वक्तव्यही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती त्यांनी आज केले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी अनौपचारी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारी महिन्यापासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करायला अवधी होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना कदाचित तुम्ही अपक्ष म्हणून उभारा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या, असा सल्ला मिळाला असेल. पण त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहिती नाही. फडणवीस यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेणे अपेक्षित होतं. पण त्यांनी तसे केले नाही.

२००९ नंतर त्यांनी जे काही समाजकारण, राजकारण केले त्या संबंधी माझ्याशी कुठलाही विचार विनिमय केला नाही. त्यांचे निर्णय हे व्यक्तीगत होते. या प्रक्रियेतही नेमके असेच घडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. त्यांच्या दोघांमध्ये जी काही चर्चा झाली त्याचा कच्चा मसुदा तयार झाल्याचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र हा कच्चा मसुदा अंतिम नव्हता. त्या दरम्यान वाटाघाटी फिसकटल्या. शिवसेनेकडून कोल्हापुरातील संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली.

या निर्णयाकडे आपण कसे पहाता असे विचारले असता. शाहू महाराजा म्हणाले, ‘हा निर्णय अतिशय चांगला असून गेली अनेक वर्ष पवार हे शिवसेनेत सक्रिय आहेत. या निर्णयानंतर मी स्वतः त्यांचे अभिनंदन केले आहे. खासदारकी हवी असेल तर त्या पक्षाचे नियमही सोबत येताततच शिवसेनेत जायचे असेल तर शिवबंधन बांधावेच लागेल. हा त्या पक्षाचा निर्णय असतो त्यामुळे तो पाळावाच लागले.’ असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT