The Slogan "No-digital flex" In Gadhinglaj Kolhapur Marathi News
The Slogan "No-digital flex" In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजमध्ये "नो-डिजीटल फ्लेक्‍स'चा नारा

अजित माद्याळे

गडहिंग्लज : अलीकडे शहरात कोठेही आणि कसेही डिजीटल फलक लावले जात आहेत. परिणामी शहराच्या सौंदर्याला बाधा येण्यासह या फलकामुळे छोटे अपघातही घडत आहेत. यामुळे पालिकेने आता शहरात "नो-डिजीटल फ्लेक्‍स' चा नारा दिला आहे. शहराच्या वाढत्या विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी यांनी पत्रकारांना दिली. आजपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू करून पालिकेच्या पथकाद्वारे डिजीटल फलक उतरविण्याचे काम सुरू करण्यात आले. 

अलीकडील काही वर्षात डिजीटल संस्कृती वाढली आहे. वाढदिवसाच्या अभिनंदनापासून दिवंगांना श्रद्धांजली असो, विविध पदांवरील निवडीपासून शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशाचे डिजीटल्स शहरातील चौकाचौकात आणि प्रमुख रस्त्यांच्या कोपऱ्यावर आणि मोक्‍याच्या ठिकाणी लावत असत. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दसरा चौकातील कारंजाही अशा फलकांनी वेढला होता. यामुळे कारंजाचा हेतूच साध्य होत नव्हता.

पालिकेकडे किरकोळ परवानगी घेवून हे फलक कुठेही आणि कशाही पद्धतीने लावले जात होते. काही वादग्रस्त फलकावरून वादावादीचे प्रसंगही यापूर्वी घडले आहेत. वीजेचे खांबही या फलकापासून वंचित राहिलेले नाहीत. अनेक फलकाची कालमर्यादा संपूनही त्याचे फ्रेम तसेच कित्येक दिवसापासून लटकत आहेत. या प्रकाराने शहराच्या सौंदर्यालाही बाधा येत आहे. शहरात एकही अशी जागा नाही की तेथे फलक नाही अशी अवस्था तयार झाली आहे. 

दरम्यान, डिजीटल फलकाची ही वाढती संस्कृती लक्षात घेवून पालिकेने आज डिजीटल मुक्तीचा निर्णय घेतला. केवळ निर्णयच घेतला नाही तर आजपासूनच त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. पालिकेच्या पथकाकडून दुपारपासूनच शहरामध्ये लावलेले डिजीटल फलक उतरवण्यात येत होते. बहुतांश ठिकाणचे फलक सायंकाळपर्यंत उतरवण्यात आल्या. पालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांतून स्वागत होत आहे. 

मटण मार्केटसाठी कर्मचारी 
पालिकेचे संकेश्‍वर मार्गावर स्वतंत्र मटण, चिकन व मच्छि मार्केट आहे. मटण आणि चिकनसाठी बकरी व कोंबड्याची कत्तल किती होते, तो प्राणी किती सशक्त आहे हे पाहणारी यंत्रणा कार्यान्वित नव्हती. आता पालिकेतर्फे तेथे एक कर्मचारी नियुक्त करणार असून त्याच्याकडून कत्तलीची माहिती नोंदविली जाणार आहे. शिवाय लवकरच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कत्तल होणाऱ्या बकरी, कोंबड्यांची तपासणीही करण्यात येणार असल्याचे श्री. कोरी यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT