shivaji university  sakal
कोल्हापूर

घोषवाक्ये बनली कृतिशील पावले...

पर्यावरणशास्‍त्र विभागात जमा केला जातो प्लास्टिक कचरा

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एन्व्हार्मेंटल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी विभागाची ‘सेव्ह एन्व्हार्मेंट सेव्ह वर्ल्ड’चा नारा देत कृतिशील पावले पडत आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेटवरील प्लास्टिक कागद, खाद्यपदार्थांच्या पिशव्या एकत्रित करून त्या कॅम्पसमध्ये पसरणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. तीन वर्षांपासून ही अनोखी मोहीम सुरू असून, ती विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांत बिंबली आहे. विभागाच्या इमारतीतील पायऱ्यांवर पर्यावरण रक्षणाची लावलेली घोषवाक्ये सार्थकी ठरली आहेत.

विद्यापीठाच्या बी. टेक. विभागाच्या इमारतीत अकरा अभ्यासक्रमात दीड हजारांहून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांत पर्यावरणविषयक जाणीव बळकट व्हावी, असा विचार प्राध्यापकांत आला. त्यासाठी एन्व्हार्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाने पुढाकार घेतला. विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत भोसले यांनी इमारतीतील जिन्याच्या पायऱ्यांवर पर्यावरणविषयक घोषवाक्ये लिहिण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांवर ती लिहिली.

विद्यार्थी खाद्यपदार्थांच्या पिशव्या, चॉकलेटचे कागद अथवा प्लास्टिक बाटल्या कॅम्पसच्या परिसरात अथवा वर्गात टाकणार नाहीत, यासाठी त्यांना आवाहन केले. त्याला प्रतिसादही मिळत गेला. प्राध्यापकांनीही वर्गात अथवा कॅम्पच्या परिसरात एखादा प्लास्टिक कागद पडला तरी तो प्लास्टिक बाटल्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात केली. प्रा. डॉ. अजित कोळेकर प्लास्टिक बाटल्यांत कचरा जमा करून तो कचरा पेटीत टाकतात.

महाविद्यालयीन आयुष्यात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पायऱ्यांवर घोषवाक्य लिहिण्याचा उपक्रम केला. त्याला प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ. श्रीकांत भोसले, विभागप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT