Social media is becoming dangerous to the world
Social media is becoming dangerous to the world 
कोल्हापूर

सोशल मिडीया ठरतोय संसाराला घातक... 

राजेश मोरे

कोल्हापूर : व्हॉटस्‌ ऍप, स्टेटस्‌ला आपल्या दोघांचा फोटो का लावत नाहीस, मी तुझा नवरा आहे, हे जगालाही माहित होऊ दे, तासंनतास तू सोशल मिडीयावर ऑनलाईन असतेस, अशा संशयी तक्रार करणाऱ्या पतीला, पत्नीही सडतोड उत्तरे देऊ लागली.

यातूनच नव दांपत्यात कटुता निर्माण झाली. बघता बघता ती इतकी वाढली की एकमेकांसाठी वर्षभरापूर्वी जीवाला जीव देणारे दांपत्य विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचले. या नवदांपत्यातील हरपलेला संवाद पुन्हा घडवून आणून त्यांच्यातील गैरसमज दूर करून संसाराची घडी पुन्हा बसविण्याचे काम महिला व बालविकास विभागाच्या महिला समुपदेश केंद्राने केले. हे एक प्रातनधिक उदाहरण. मात्र आजकाल अशा तक्रारी येण्याचे प्रमाण वाढत आहे. संशय, इगो, घरगुती कारणासारख्या किरकोळ गैरसमज वेळीच दूर करून संसाराची घडी पुन्हा बसविण्याचे काम या केंद्रातर्फे सुरू आहे. 

पती, सासरची मंडळी नांदवत नाही, जाच करतात, शारीरिक समस्येवरून संसारात खटके उडण्याचे प्रमाण हे नवीन नाहीत. पण आज तरुणाईत मित्र मैत्रिणींची जागा मोबाईलने घेतली आहे. संवादापासून ही तरुणाई दूर गेली आहे. अशी तरुणाई लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतरही मोबाईलच्या विळख्यातच राहते. व्हॉटस्‌ ऍपला डीपी स्टेटस्‌ लावण्यापासून ते व्हिडीओ कॉलींगद्वारे सासरी घडलेल्या प्रत्येक गोष्टींची खडान्‌खडा माहिती माहेरच्यांना देण्याचे प्रकार सुरू होतात. यातूनच संसाराला ग्रहण लागण्यास सुरवात होते. दांपत्यात संशयाचे वातावरण तयार होते. त्यात त्यांच्यातील इगो आडवा येतो. गैरसमज वेळीच दूर करण्यापेक्षा घरच्यांकडूही अनेकदा अशी कृती होते, की ताणलेली नाती तुटण्यापर्यंत पोहचतात. टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत गेलेले घरगुती तंटे पोलिसांतर्फे महिला व बालविकास विभागाच्या महिला समुपदेशन केंद्राकडे येतात. पोलिस मुख्यालयात हे केंद्र आहे. येथे समुपदेशकाकडून हे तंटे मिटवून संसाराची घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न केला जातो. हे केंद्र सकाळी 10 ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू असते. याठिकाणी सरासरी महिन्याला 25 तक्रारी येण्याचे प्रमाण आहे. येथे पोर्णिमा कोठावळे आणि अतुल चौगले समुपदेशकांची जबाबदारी पार पाडत आहेत. 

महिला समपुदेशन केंद्राची संख्या 
*जिल्हास्तरावरील (पोलिस मुख्यालयात) 
तालुकास्तरावर 
*शिरोळ (कुरुंदवाड पोलिस ठाणे) 
*शाहूवाडी (शाहूवाडी पोलिस ठाणे) 
*करवीर (राजारामपुरी पोलिस ठाणे) 

सोशल मिडीयाचा अतिरिक्त वापर हे संसारात खटके उडण्याचे मोठे कारण ठरत आहे. पती-पत्नीसह कुटुंबाचे समुपदेश करून त्यांच्या ताणलेल्या संसाराची पुन्हा घडी बसविण्याचे काम महिला समुपदेशन केंद्रात केले जाते. 
- पोर्णिमा कोठावळे, समुपदेशक. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT