social media viral video of kolhapur petrol pump 
कोल्हापूर

हे कोल्हापूर हाय! छातीत कळ आल्यास आम्ही जबाबदार नाही; चर्चा पंपावरच्या बोर्डाची

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : 'पेट्रोल दर स्वतःच्या जबाबदारीवर पहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही,' असा पेट्रोलपंपावरील एलईडी बोर्ड आज कोल्हापुरात चर्चेत आला. एका व्यक्तीने या बोर्डचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर अपलोड केले. त्यानंतर 'हे फक्त कोल्हापुरातच घडते', 'स्थळ अर्थात कोल्हापूर' अशा टिप्पणीच्या पोस्ट व्हायरल झाल्या. सायंकाळी या पोस्टमुळे पेट्रोलचा प्रति लिटर दर शंभर झाल्याची अफवा ही पसरली होती. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोल्हापूर जवळील एका पेट्रोल पंपावर सुचना देण्यासाठी एलईडी बोर्ड आहे. याच बोर्डवर आज 'पेट्रोल दर स्वतःच्या जबाबदारीवर पहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही, पेट्रोल पंप मालक संघटना' असा संदेश फिरू लागला. त्यामुळे पंपावर हा विषय चर्चेत आला. एका ग्राहकाने त्याचे चित्रीकरण करून ते व्हायरल केले. त्यामुळे या बोर्डची चर्चा चहाच्या टपरीपासून तो मंत्र्यांच्या 'ट्वीट' पर्यंत सुरू झाली. सोशल मीडियावर 'स्टेटस' होता. तर 'क्‍लिप' ही अनेकांनी व्हॉटस्‌ ऍप ग्रुपवर 'शेअर' करून त्याला प्रसिद्धी दिली. अनेकांनी यामध्ये कोल्हापुरात असे घडू शकते. कोल्हापुरातील हा पंप आहे, अशी टिप्पणीही त्यावर केली. 

गेल्या काही दिवसांत रोज 30-35 पैशांनी पेट्रोल दर वाढत आहेत. ब्रॅण्डेड पेट्रोलचा दर 99 रुपयांहून ही अधिक पोचला आहे. शंभर रुपये केव्हाही होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांचेच नव्हे तर सर्वांचेच लक्ष आता पेट्रोलच्या दराकडे लागून आहेत. त्यातच ही पोस्ट व्हायरल झाल्यामुळे त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. 

दरम्यान याबाबत वस्तूस्थिती पाहण्यासाठी 'सकाळ'ने संबंधित पेट्रोल पंप मालकांकडे संपर्क साधला असता त्यांनी सकाळी काही कामगारांनी हा संदेश ठेवला आहे. नेमका कोणी ठेवला याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. नंतर तो काढला असल्याचे सांगितले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT