Solve the lingering question of Ambeohol, Naganwadi project rehabilitation 
कोल्हापूर

आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावा

निवास चौगले

कोल्हापूर ः येत्या पंधरा दिवसांत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अप्पर जिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी यांनी आंबेओहोळ, नागणवाडी प्रकल्पाच्या पुनर्वनसनाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशा सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. 
येथील शासकीय विश्रामगृहात आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भात आज ग्रामविकासमंत्र्यांनी बैठक घेतली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, राधानगरीचे प्रांताधिकारी रामहरी भोसले, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, पाटबंधारे विभागाचे अक्षीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, एस. आर. पाटील, पुनर्वसन तहसीलदार वैभव पिलारे उपस्थित होते. 
श्री. मुश्रीफ म्हणाले, की आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम 20 वर्षांपासून सुरू आहे. अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून रेंगाळलेली कामे मार्गी लावावीत. पावसाळ्यापूर्वी घळभरणी करावी. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. 
आंबेओहोळ आणि नागनवाडीच्या पुनर्वसनाबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी या दोन्ही कार्यालयांमधील कामकाजामुळे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. ते तत्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांनाच अधिकार द्यावेत. त्यासंदर्भात 
आजच आदेश काढावेत, अशी सूचना ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना बैठकीमधून संपर्क साधत केली. 
श्री. मुश्रीफ म्हणाले, ""गलगले वसाहतीबाबत वन विभागाने जमीन देण्याची पूर्तता करावी. चांदोली अभयारण्यासाठी जमिनी दिलेल्या शाहूवाडी तालुक्‍यातील निवळे येथील ग्रामस्थांना कागल तालुक्‍यातील गलगलेमध्ये गावठाण वसाहत जमीन देण्यात आली. याबाबत उच्च न्यायालयाने जमीन मूळ मालकाला देण्याचे आदेश दिल्याने या बाधित ग्रामस्थांच्या वसाहतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाची कागलमध्ये असणारी जमीन देण्याचा ठराव कागल नगर परिषदेने केला. वन विभागाने याबाबत त्यांना निर्वाह भत्ता देणे, तसेच जमीन देण्याची पूर्तता करावी. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून पाठपुरावा करावा.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT