Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : धक्कादायक! दारूसाठी पोटच्या पोरानं घोटला आईचा गळा; चेहऱ्यावर जखमा, कानातून आलं रक्त

दारूच्या (Liquor) व्यसनात गुरफटलेल्या तरुणाने आईचा खून केला.

सकाळ डिजिटल टीम

मृतदेहाशेजारी दोरीही सापडली. सुनीता यांचा गळा आवळून त्यांचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

कागल : दारूच्या (Liquor) व्यसनात गुरफटलेल्या तरुणाने आईचा खून केला. हा प्रकार काल (गुरुवार) वंदूर (ता. कागल) येथे घडला. दारूला पैसे न दिल्यावरून हा खून झाल्याचे कागल पोलिस ठाण्यात (Kagal Police Station) नोंद आहे. सुनीता अशोक वाईंगडे (वय ५१) असे तिचे नाव आहे.

पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करीत मुलगा नीलेश अशोक वाईंगडे (३०) याला अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुनीता वाईंगडे या नीलेशसह वंदूर येथील वाईंगडे मळ्यात राहत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले.

आनंदाने घरात जाऊन पाहिले असता सुनीता जमिनीवर पडल्याचे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. चेहरा सुजला होता. कानातून रक्तही आले होते. त्यामुळे आनंदा याने पोलिसांना कळविले. कागलचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक शैलजा पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सुनीता यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. मृतदेहाशेजारी दोरीही सापडली. सुनीता यांचा गळा आवळून त्यांचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी मृतदेह कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या तपास पथकाने भेट दिली. पोलिसांनी संशयावरून सुनीता यांचा मुलगा नीलेशला अटक केली. आपणच हा खून केल्याची माहिती त्यांने दिल्याचे पोलिसांतून सांगण्यात आले. नीलेशला दारूचे व्यसन असून, त्याचा अपघातही झाला होता. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याचे मानसिक संतुलनही बिघडले असल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनानंतर खुनाबाबत अधिक तपशील मिळतील, असे तपास अधिकारी गजेंद्र लोहार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

SCROLL FOR NEXT