special article of kolhapur heritage by uday gaikwad in kolhapur municiple corporation 
कोल्हापूर

स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू ; कोल्हापूर महापालिका इमारत

उदय गायकवाड

कोल्हापूर : करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणींची प्रतिमा बोधचिन्ह आणि छत्रपती शाहू महाराजांचा विचार बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्‍य घेऊन नगरपालिका, महापालिका असा प्रवास करणारी इमारत स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू बनली आहे. शहरातील जुनी वास्तू म्हणून तिचे महत्त्व आहेच. बांधकाम शैली म्हणून फारसे वेगळेपण नसले तरीही शहरात मध्यवर्ती असलेली ही इमारत लक्ष वेधून घेते.

काळ्या घडीव दगडात बांधलेली ही इमारत आयताकृती आहे. दुमजली असलेल्या या इमारतीला मध्यभागी मोठा प्रशस्त चौक आहे. चारही बाजूंनी प्रवेशद्वार असलेल्या कमानीची रचना देखणी आहे. सध्या पूर्व व उत्तरेकडील कमानीचा वापर होत असून, उर्वरित दोन्ही व्यवसायासाठी वापरात आहेत. पहिल्या मजल्याला पूर्व व पश्‍चिम बाजूला सज्जा असलेली गच्ची आहे. पश्‍चिम बाजूच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर सभागृह १९५३ मध्ये बांधण्यात आले. नगराध्यक्ष बी. बी. पाटील यांच्या कारकिर्दीत १२ ऑक्‍टोबर १९५८ रोजी छत्रपती राजर्षी शाहू सभागृह असे नामकरण करण्यात आले.

ही इमारत दोन टप्प्यात बांधण्यात आली असून, पूर्व, दक्षिण व उत्तरे कडील काही भाग १९२९ मध्ये बांधण्यात आला. त्यासाठी एक लाख साठ हजार रुपये खर्च आला होता. ही इमारत कोल्हापूरचे तत्कालीन रेसिडेंट जे. डब्लू. बी. मेरिवेदर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ उभारण्यात आली व उद्‌घाटन मेजर एल. इ. ल्यंगज यांच्या हस्ते  ३० जानेवारी १९२९ रोजी करण्यात आले. पश्‍चिम  व उत्तरेकडील राहिलेला भाग १९५५ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आला. त्या कामासाठी दोन लाख चौऱ्याहत्तर रुपये खर्च आला. नगराध्यक्ष पा. ह. हळदकर यांच्या कारकिर्दीत महात्मा गांधी मार्केट असे नामकरण करण्यात आले. स्थायी समिती सभागृहाला छत्रपती ताराराणींचे नाव देण्यात आले आहे.

इमारतीवर उत्तर व दक्षिण बाजूला ध्वजस्तंभ असून, एका बाजूला भगवा तर दुसऱ्या ठिकाणी तिरंगा ध्वज लावण्याची परंपरा आहे.
मध्यभागी असलेल्या चौकाला विठ्ठल रामजी शिंदे चौक असे नाव देण्यात आले आहे. पहिले नगराध्यक्ष  कसबेकर जाधव यांचा पुतळा बसविला आहे. प्रवेशद्वाराजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. वारसा वास्तू म्हणून या इमारतीकडे तसे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. अंतर्भागात गरजेप्रमाणे वारसा मूल्यांचा विचार न करता लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे बदल केले आहेत. काही भाग वगळला तर उर्वरित भागात कपाटे, टेबल, खुर्च्या, फायली यांची अव्यवस्था दिसून येते.

लाईट फिटिंग, मूळ खिडक्‍या काढून अॅल्युमिनियम खिडक्‍या, पार्टीशन, रंगकाम, फरशी असे अनेक बदल झाले आहेत.
पार्किंग हा मुद्दा तर कमालीचा अस्वस्थ करणारा ठरला असून, त्याला शिस्त लावणे ही हाताबाहेर गेलेली बाब आहे. दुकानगाळे ही तत्कालीन योग्य वाटलेली बाब असली तरी आता त्याचा वेगळा विचार करून त्यांचे पुनर्वसन करून महापालिकेच्या इमारतीचे वारसा महत्त्व विचारात घेऊन पुनर्रचना केली पाहिजे.

नगरपालिकेची १८५४ मध्ये स्थापना

जॉर्ज माल्कम हे कोल्हापूरचे पॉलिटिकल एजंट असताना शहरातील अस्वच्छतेचे निर्मूलन करण्यासाठी एक यंत्रणा असावी, यासाठी १२ ऑक्‍टोबर १८५४ ला नगरपालिकेची स्थापना झाली.  नंतर हा कारभार लोकप्रतिनिधींकडून काढून दरबारकडे होता. पुन्हा १९२१ पासून लोकप्रतिनिधी नेमले. १५ डिसेंबर १९७२ मध्ये महापालिकेची स्थापना 
झाली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT