special article of uday gaikwad on heritage of kolhapur memorial church in kolhapur 
कोल्हापूर

हेरिटेज ऑफ कोल्हापूर ; वायल्डर मेमोरियल चर्च, त्यागमय सेवेची साक्ष

उदय गायकवाड

कोल्हापूर : पांढरा शुभ्र रंग दिलेले, अगदी गजबजलेल्या ठिकाणी गर्दीत अडकलेले या चर्चची वास्तू मुळातच शांत वाटते. बडेजाव, दिखावूपणा, डामडौल झुगारून उभी असलेली ही वास्तु २९ ऑक्‍टोंबर १९२९ ला रेव्ह. डॉ. वायल्डर यांच्या समर्पित व त्यागमय सेवेची साक्ष म्हणून त्यांच्या नावानेच एक उत्तम वारसा म्हणून आजही अस्तित्वात आहे.

अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी १८१३ मध्ये मुंबईत आले. त्यापैकी रेव्ह. डॉ. रॉयल गोल्ड वायल्डर हे ४ डिसेंबर १८५२ रोजी कोल्हापूरमध्ये धर्म प्रसारासाठी आले. ते पोहचता क्षणीच त्यांना कोल्हापूरच्या आत घेऊ नये, हद्दपार करावे म्हणून लोकांनी पोलिटिकल एजंटकडे अर्ज केला. तो अर्ज मुंबईला गव्हर्नर साहेबापर्यंत गेला. मात्र, तो नाकारला गेला. तरीही त्यांना कोल्हापूरकरांनी विरोध केल्याने राहायला घरही मिळाले नाही. काही काळ तंबूमध्ये राहिले, तर काही काळ रंकाळा मिलिटरी कॅम्पमध्ये राहिले.

रस्त्यावर धर्म उपदेश करायलाही लोकांनी त्यांना विरोध केला. तत्कालिन छत्रपती शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांना भेटून लोकांनी त्यांना हकलण्याची विनंती केली. महाराजांनी मात्र लगेचच निर्णय न देता बायबल वाचून पहिले. ते ज्ञान उपयोगी आहे, चुकीचे नाही आणि ख्रिस्ती आपल्याला निरुपद्रवी आहेत, त्यांना त्रास देवू नका, असे सांगितले. त्यानंतर वायल्डर यांनी धर्म प्रसार व शिक्षण प्रसार सुरू केला. त्या काळात ४४ हजार लोकसंख्या असलेल्या कोल्हापुरात फक्त बारा विद्यार्थी शिकत असलेली एकच शाळा होती.

वायल्डर यांनी ठिकठिकाणी शाळा सुरू केल्या. त्यामध्ये ते दोघे पती-पत्नी शिकवत होते. मुलांबरोबर काही पालकही शाळेत येत होते. निरक्षरांना शिकवण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांची संख्या तीन हजारांवर गेली. महाराजांनी वायल्डर यांच्या पत्नीस आपल्या दोन भगिनीसोबत राजवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करायला सांगितले. कोल्हापूरमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचे श्रेय त्यांना जाते. १८६३ च्या सुमारास कोल्हापूरमध्ये ५१ लोक ख्रिस्ती धर्म स्वीकारून रहात होते.

१८६५ मध्ये रेव्ह डॉ. वायल्डर यांनी महापालिकेच्या इमारती मागे फक्त ५० फूट लांब आणि ३० फूट रुंद एवढ्या जागेत प्रार्थना मंदिर (चर्च) बांधले. या वास्तूसाठी लागलेला दगड खाणीतून काढून आणणे, बांधकाम करणे, सुतार गवंडी काम करणे हे स्वतः केले. चर्च उभे करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. रेव्ह. डॉ. वायल्डर यांच्या ८७ वर्षाच्या धर्म प्रसार व शिक्षण प्रसार केलेल्या कारकिर्दीत कोल्हापूरमध्ये उभे राहिलेले हे पहिले चर्च म्हणून त्याला वारसा महत्त्व आहे. 

आज फेरीवाले, फलक, विक्रेते यांच्या गर्दीत आणि आजूबाजूला नव्याने उभारलेल्या इमारतीमध्ये ही वास्तू गुदमरत आहे, असेच वाटते. महापालिकेकडे आशेने पहावे अशी या वास्तूची स्थिती आहे. खरोखरीच थोडासा बदल करून या वास्तूला वारसास्थळ म्हणून वेगळी ओळख करून देणे शक्‍य आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT