special dish from kolhapur radhanagari dudh amti or dudh sar
special dish from kolhapur radhanagari dudh amti or dudh sar 
कोल्हापूर

खवय्यांनो, जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीची दूध आमटी माहिती आहे का?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटंल की, तांबडा - पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ, राजाभाऊची भेळ, झुणका भाकरी अशा चविष्ट पदार्थांची पर्वणीच. परंतु या खवय्येप्रेमींच्या नगरीत आणखी एक जुना पदार्थ आहे. जो आजही अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. आता तु्म्ही आश्चर्यचकित व्हाल की दुध आमटी हा कोणता नवा पदार्थ आहे. 
 
शाकाहारी बरोबरच मांसाहारी खवय्यांच्या पसंतीस उतरलेला राधानगरीतील एक खास पदार्थ म्हणजेच दूध आमटी! दुधाची 'आमटी' होऊ शकते हे कुणी सहज सांगायला गेले तर पटण्या पलीकडचे .परंतु होय, हे खरे आहे. आणि हा खाद्यपदार्थ आता इथली जणू खाद्यसंस्कृतीच बनला आहे. त्यामुळेच तो स्थानिकांबरोबरच दूरवरून येणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीसही उतरला आहे. 

राधानगरीच्या शेजारी असलेल्या सोन्याची शिरोली या छोट्या खेडेगावात खूप वर्षांपूर्वी या पदार्थाची प्रथम निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. तेथे सांगावकर, निल्ले, मुधाळे, बेळंके अशा जैन समाजातील कुटुंबांमध्ये दूध आमटी खूप पूर्वीपासून हमखास बनविली जाते. या दूध आमटीला जैन समाजामध्ये (जैनी कन्नड भाषेत) 'दूध सार' असेही म्हटंले जाते. सोन्याची शिरोली मधूनच हा खाद्यपदार्थ राधानगरीतील जैन समाजाच्या कुटुंबांमध्ये आला आणि आता या पदार्थाने राधानगरी तालुक्‍यासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अनेक मिश्रहारी कुटुंबांतही स्थान पटकावले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना सचिन बोंबाडे म्हणाले, 'खूप पूर्वीपासून येथे दूध आमटी घरांघरांत बनविली जाते. शाकाहारी कुटुंबांमध्ये रविवारी आठवड्याच्या बाजारादिवशी हा पदार्थ प्रत्येकाच्या ताटात हमखास असतोच. त्यासाठी लागणाऱ्या 14 मसाल्यांची विक्री आम्ही आमच्या पूर्वीच्या दुकानातून करीत होतो. बंधू संजय हे या दूध आमटीसाठी अगदी प्रमाणात मसाला देण्यासाठी माहिर होते. त्यांच्या अनुभवातूनच मी व माझी पत्नी मनीषा हा चौदा प्रकारचा मसाला प्रमाणात देवू लागलो.

राधानगरी हे अलीकडील काही वर्षांत पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आल्याने या दूध आमटीची ख्याती पर्यटकांपर्यंत पोहोचली. येथील सुनील बडदारे यांच्या हॉटेलमध्ये खास खवय्यांसाठी हा पदार्थ ताटात स्पेशल डिश म्हणून वाढला जातो. त्यांना हा पदार्थ बनवण्यासाठी आमच्याकडून 14 प्रकारचा खडा मसाला नेऊन त्याचे मिश्रण करावे लागत होते. त्यांच्या मागणीवरून त्यांनी आम्हाला हा मसाला पावडर रूपात पूरवावा असे सुचविले. मग आम्ही हा मसाला पावडर रूपात तयार करू लागलो. त्याची मागणीही खडा मसाला प्रमाणेच घरोघरी वाढली. अनेक किराणा दुकानदारही हा आमचा मसाला विक्रीसाठी ठेवू लागले. 

पुढे अन्न व औषध प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन 'रुचि मसाले' या नावाने बोंबाडे ट्रेडर्सचे उत्पादन म्हणून आम्ही हा मसाला बनविण्याचा उद्योग सुरू केला आणि वाढविला. आता हा राधानगरीसह कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक किराणा दुकानदारांकडे उपलब्ध आहे. शिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून व राज्याबाहेरूनही पर्यटनासाठी आलेले अनेक पर्यटकही हा मसाला खास खरेदी करतात. यावरून या दूध आमटीचा प्रसार किती दूरवर पोहोचला आहे याची प्रचिती येऊ शकेल.

दूध आमटीची चव व कृती याबद्दल माहिती देताना मनिषा बोंबाडे म्हणाल्या, अत्यंत रुचकर अशी तिखट व गोडसर चव असलेली ही दूध आमटी करताना किती लिटरची दुध आमटी करायची आहे त्या प्रमाणात तयार रुची मसाल्यामध्ये आले, लसुण, बारीक चिरलेला भाजलेला थोडा कांदा, कोथिंबीर व थोडे दूध घालून पेस्ट करावी. गरजेनुसार प्रमाणात तेल भांड्यात तापवून त्यामध्ये बारीक चिरलेला जादाचा कांदा परतून घ्यावा. बटाट्याचे बारीक काप त्यात घालावे.गरजेनुसार लाल चटणी (मसाला मिसळून तयार केलेली) घालावी व तयार केलेली मसाला पेस्ट त्यामध्ये मिसळून दूध ओतावे. या सर्व मिश्रणाला चांगली उकळी द्यावी. बटाटे शिजल्यानंतर गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर टाकावी. विशेष म्हणजे हा पदार्थ बनविताना आमटी मध्ये मीठ वापरू नये. ते ताटाला लावून जेवताना आमटीत घ्यावे.चपाती, ब्रेड व भाताबरोबर ही आमटी खूप चविष्ट लागते. बारीक तांदळाचा मऊ भात असल्यास चव अजूनच लज्जतदार बनते. नारळी भाताबरोबरही दूधआमटी अत्यंत रुचकर लागते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT